Mumbai News | कोरोनानंतर भारतीयांचे आयुर्मान एक वर्षाने घटले

COVID-19 Impact On Life Expectancy | इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीजच्या संशोधनाचा निष्कर्ष
Covid 19
Covid-19 Impact(File Photo)
Published on
Updated on

COVID-19 Impact On Life Expectancy

मुंबई : कोरोना साथीने केवळ भारतीय लोकांचे जीव घेतले नाहीत तर त्याचे दीर्घकालीन परिणाम अजूनही लोकांच्या जीवनात दिसून येतात. एका आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, कोविडमुळे भारतीयांचे आयुर्मान एक वर्षाने कमी झाले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज (खखझड) च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतीयांचे सरासरी आयुर्मान 70.4 होते, जे 2021 मध्ये कमी होऊन 68.8 झाले. संशोधकांचा असा विश्वास आहे की जर महामारी नसती तर आयुर्मान सरासरी एक वर्ष जास्त झाले असते.

भारताच्या रजिस्ट्रार जनरलने अलीकडेच 2021 सालासाठी जन्म-मृत्यू दर अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचा भारताच्या वयावर काय परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी आयआयपीएसचे संशोधक चंदन कुमार, डॉ. प्रवत भंडारी आणि हिमांशू जयस्वाल यांनी डॉ. सूर्यकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभ्यास केला.22 राज्यांमध्ये विश्लेषण केले आहे. संशोधकांनी महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये विश्लेषण केले. यापैकी 19 राज्यांमध्ये 2021 मध्ये आयुर्मानात मोठी घट झाली. गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये ही घट सर्वाधिक होती. याउलट, आसाम, जम्मू आणि उत्तराखंडमध्ये एका वर्षापेक्षा कमी कालावधीची तुलनेने कमतरता दिसून आली. तर राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश ही सर्वात कमी घट झालेल्या राज्यांमध्ये होती.

Covid 19
Covid-19 in Europe: कोरोनाची युरोपमध्‍ये पुन्‍हा एंट्री, ऑस्‍ट्रियामध्‍ये २० दिवसांचे लॉकडाउन

पुरुषांच्या आयुर्मानात 2.2 वर्षांनी घट: महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आयुर्मानात मोठी घट झाली आहे. 2019 मध्ये पुरुषांचे सरासरी आयुर्मान 68.9 वर्षे होते, जे 2021 मध्ये 66.7 वर्षांपर्यंत घसरले. महिलांचे आयुर्मान 0.5 वर्षांनी कमी झाले आहे.उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्येही घट दिसून आलि. 2021 मध्ये उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सरासरी आयुर्मानात घट अमेरिकेत -2.3 वर्षे, हंगेरीमध्ये -1.9 वर्षे आणि नेदरलँडमध्ये -1.2 वर्षे होती.

Covid 19
Covid 19 India : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ!

महाराष्ट्रात पुरुषांच्या आयुर्मानात अधिक घट

महाराष्ट्रात 2019 मध्ये पुरुषांचे सरासरी आयुर्मान 72 वर्षे होते आणि महिलांचे सरासरी आयुर्मान 75 वर्षे होते. जे 2021 मध्ये अनुक्रमे 68 आणि 74 वर्षांपर्यंत कमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news