‘बिहार पॅटर्न’ राबवा, मला मुख्यमंत्री करा; अजित पवारांची अमित शहांकडे मागणी

इंग्रजी दैनिकाचे वृत्त
Maharashtra politics
‘बिहार पॅटर्न’ राबवा, मला मुख्यमंत्री करा; अजित पवारांची अमित शहांकडे मागणीfile photo
Published on
Updated on

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्र दौर्‍यावर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही ‘बिहार पॅटर्न’ राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात मंगळवारी प्रसिद्ध झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळले आहे. मी अमित शहा (Amit Shah) यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. मात्र, आमच्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती आणि मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर कसलीही चर्चा झाली नाही. यासंबंधी एका इंग्रजी दैनिकाने दिलेले वृत्त निखालस खोटे असून, मैत्रीपूर्ण लढतीला काहीही अर्थ नसतो, महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होऊ नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमित शहा (Amit Shah) यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यात अजित पवार (Ajit Pawar) कोठेही त्यांच्यासोबत दिसले नव्हते. त्यावरून अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शहा यांनी सोमवारी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत आगामी विधानसभेसाठी राजकीय खलबते केली होती. महायुतीतील दोन्ही पक्षांचा जागावाटपावेळी उचित मान राखला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. याच चर्चेदरम्यान, अजित पवार यांनी शहा यांच्याकडे थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचे या वृत्तामध्ये म्हटले होते.

मैत्रीपूर्ण लढतींना अर्थ नसतो

अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, महायुतीच्या घटकपक्षांमध्ये 288 पैकी काही जागांवर मतैक्य झाले आहे. अन्य जागांवर अजून काहीही ठरलेले नाही. जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याची माहिती आम्ही माध्यमांना देऊ. माझ्या मते, मैत्रीपूर्ण लढतींना कोणताही अर्थ नसतो. आम्ही आघाडीत असतानाही अशी निवडणूक कधी लढली नाही. चार किंवा आणखी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार, या सगळ्या थापा आहेत. असे काहीही होणार नाही, असे ते म्हणाले. आम्ही सर्वजण बैठक घेऊन 288 जागांपैकी महायुतीमधील कोणत्या पक्षाला कुठल्या जागा द्यायच्या, हे निश्चित करत आणले आहे. महायुतीच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे लक्ष्य आहे. त्याद़ृष्टीने आम्ही काम करत आहोत, असे ते म्हणाले.

बस्स झाले माझे फोटो

भाजप आणि शिवसेनेच्या सरकारी योजनांच्या जाहिरातींवर तुमचा फोटो नाही, असे निदर्शनाला आणले असता अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, माझा फोटो जाहिरातींमध्ये लावू नका, असे मीच भाजप आणि एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. सर्वत्र माझे फारच फोटो लावले जात आहेत. ते थोडे कमी केले जावेत, असे मला वाटते. लाडकी बहीण ही महायुतीची योजना आहे. त्यामुळे घटकपक्ष आपापल्या पद्धतीने ती मांडण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर आणखी बोलण्याला बगल दिली.

अजित पवार यांची महायुतीकडे काही मागावे, अशी सध्या अवस्था नाही. अजित पवार स्वतःहून अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी करतील, असे मला अजिबात वाटत नाही. मुळात भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळे तिथे अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

Maharashtra politics
शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण: सुनावणी पुन्हा लांबणीवर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news