राज्यात ४९३ कोटींचा मुद्देमाल जप्त; सोने, चांदीचाही समावेश

सर्वाधिक धाडी मुंबई, नागपुरात, आचारसंहितेत रोकड, दारूचा सुकाळ
 Maharashtra election seizures
राज्यात ४९३ कोटींचा मुद्देमाल जप्त; सोने, चांदीचाही समावेशfile
Published on
Updated on

मुंबई : निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा रोकड, दारू, ड्रग्ज आणि सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंसारखा बेकायदा रोकड, दारू, ड्रग्ज आणि मुद्देमाल पकडला जात आहे. आतापर्यंत राज्यात ४९३ कोटी ४६ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बेकायदा मुद्देमालाबाबत राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपुरात जणू स्पर्धाच लागली आहे. मुंबई उपनगरात १३८ कोटी, मुंबई शहरात ४४ कोटी आणि उपराजधानीचे ठिकाण असलेल्या नागपुरातून ३७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या देखरेखीत पोलीस दलासह प्रशासनाच्या विविध पथकांनी बेकायदा मुद्देमाल ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रचंड प्रमाणात बेकायदा रोकड, दारूचा वापर होत असल्याचे चित्र आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून पहिल्या पंधरा दिवसांतच मागील प्रचंड प्रमाणात रोकड पकडण्यात आली विशेष म्हणजे मागील निवडणुकांच्या काळात पकडलेल्या रकमेच्या अडीचपट रक्कम केवळ पंधरा दिवसांतच उजेडात आली होती. रोकड, दारू, ड्रग्स आणि मौल्यवान धातूंच्या या मुक्तसंचारावर भारत निवडणूक आयोगानेही चिंता व्यक्त केली होती. मात्र, निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे रोकड आणि मुद्देमाल सापडण्याच्या घटना वाढतच आहेत.

सर्वाधिक मुद्देमाल जप्त झालेले पाच जिल्हे

मुंबई उपनगर - १३८ कोटी १९ लाख

मुंबई शहर ४४ कोटी ९५ लाख

नागपूर ३७ कोटी ५३ लाख

पुणे ३२ कोटी २९ लाख

अहमदनगर २९ कोटी ९८ लाख

सर्वाधिक रोकड जप्त झालेले पाच जिल्हे

मुंबई शहर - ३१ कोटी ६३ लाख

नागपूर - १८ कोटी १८ लाख

पालघर १३ कोटी ९६ लाख

ठाणे १२ कोटी ४१ लाख

पुणे - ११ कोटी २९ लाख

फुकट वाटप वस्तूंची जप्ती

रायगड - १३ कोटी ६ लाख

ठाणे - ६ कोटी ८९ लाख

पुणे - ६ कोटी ६० लाख

सर्वाधिक दारू जप्तीचे जिल्हे

पुणे - ५ कोटी १७ लाख

नांदेड ३ कोटी २२ लाख

अहमदनगर ३ कोटी ४ लाख

वर्धा २ कोटी ९६ लाख

नाशिक २ कोटी ५५ लाख

धुळे - २ कोटी ४९ लाख

नागपूर २ कोटी ३० लाख

सर्वाधिक ड्रग्ज जप्तीचे जिल्हे

मुंबई उपनगर ३९ कोटी ९० लाख

बुलढाणा - ४ कोटी ५४ लाख

मुंबई शहर ४ कोटी ६ लाख

ठाणे १ कोटी ६४ लाख

सर्वाधिक मौल्यवान वस्तू जप्तीचे जिल्हे

मुंबई उपनगर ८४ कोटी १६ लाख

अहमदनगर २३ कोटी ६१ लाख

नागपूर १३ कोटी ८२ लाख

औरंगाबाद ९ कोटी २४ लाख

पुणे- ८ कोटी ६३ लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news