.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : भाजलेल्या चिकणमातीच्या विटा (बर्ट क्ले ब्रिक्स) आणि वाफेवर तापवून तयार केलेले वायुमिश्रित काँक्रीटचे ठोकळे (एएसी ब्लॉक्स) या पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर केला असता घरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होत असल्याचे तसेच कमी उष्मा वाहकता आणि विशिष्ट उष्णता क्षमता यामुळे उष्णता हस्तांतरण कमी करून तापमान कमी ठेवण्यास मदत होत असल्याचे निदर्शनास आल्याने यावर आयआयटीने संशोधन केले आहे.
घरात हवा खेळती असावी आणि घरातील तापमान थंड असावे, असे म्हटले जाते. त्यानुसार घरे बांधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र घर किंवा इमारत बांधण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यामुळे बऱ्याचदा घरातील तापमान अधिक राहते. याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. हीच बाब लक्षात घेता आयआयटी मुंबई आणि कम्युनिटी डिझाईन एजन्सी यांनी यावर एकत्रित संशोधन केले. आरामदायी तापमानाचा मनुष्याच्या स्वास्थ्यावर आणि कार्यक्षमतेवर थेट परिणाम होतो. व्यवस्थित खेळती हवा नसेल तर अति-उष्णता आणि आर्द्रता असलेल्या भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जगणे कठीण होऊन बसते. तीव्र उष्णतेच्या लाटा आणि 'अर्बन हीट आयलंड फेनोमेनन' (अवतीभवतीच्या परिसरापेक्षा जास्त उष्ण शहरी भाग) या सारख्या जागतिक हवामान बदलांमुळे या अडचणींमध्ये आणखी भर पडते, एखादी इमारत वास्तव्य करण्यास किती अनुकूल आहे हे मुख्यतः बांधकाम साहित्यावर अवलंबून असते. इमारतीच्या आवरणाचा ४० टक्के पेक्षा जास्त भाग हे बांधकाम साहित्याने व्यापलेले असते. त्याचे उष्णता शोषून, साठवून आणि उत्सर्जित करून घरातील तापमान ठरवण्यात महत्त्वपूर्ण योगदान असते. इमारतींची छते, भिंती, फरशी, खिडक्या, दरवाजे आणि पाया यांचा आवरणात समावेश असून, ते घराच्या आतील आणि बाहेरील बाजूच्या तापमानाला प्रतिबंध म्हणून काम करतात व उष्णता हस्तांतरणावर लक्षणीय परिणाम करतात. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई आणि कम्युनिटी डिझाईन एजन्सीच्या संशोधकांनी या अभ्यासात भिर्तीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि त्यांची तापमान टिकविण्याची क्षमता यांचा परस्पर संबंध शोधणारी नवीन पद्धत विकसित केली आहे.
नसलेल्या घरांच्या आतील तापमान तपासले. तसेच कॉम्पुटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (सीएफडी) नावाचे एक अनुरूपणावर (सिम्युलेशन) आधारित संख्यात्मक तंत्र वापरून भिंत निर्माण करण्याचे साहित्य, हवेचा बदलणारा प्रवाह आणि आरामदायी तापमान यांच्यातील परस्पर संबंध तपासला. सीएफडी तंत्रज्ञान वापरून हवेच्या प्रवाहाचे विश्लेषण केले. यामध्ये 'सर्व खिडक्या उघड्या आणि दारे बंद' आणि 'सर्व खिडक्या, दारे बंद' या कोणतेही कृत्रिम वातानुकूलन विविध स्थितींमध्ये सीएफडीचा वापर करून घरांमधील हवेचा प्रवाह आणि तापमान तपासण्यात आले.
संशोधकांनी भिंतींच्या बांधकाम साहित्यामध्ये वाफेवर तापवून तयार केलेले वायुमिश्रित काँक्रीटचे ठोकळे (एएसी ब्लॉक्स), कॉम्प्रेस्ड स्टॅबिलाइझ्ड मातीचे ठोकळे, भाजलेल्या चिकणमातीच्या विटा (वर्ट क्ले ब्रिक्स), आणि कॉम्प्रेस्ड फ्लाय शचे ठोकळे यांचा विचार केला. कॉम्प्रेस्ड स्टेबिलाइझ्ड मातीचे ठोकळे आणि कॉम्प्रेस्ड फ्लाय शच्या ठोकळ्यांपेक्षा एएसी ब्लॉक्स हे बाहेरील उष्णतेपासून घरातील तापमान कमी ठेवण्यामध्ये प्रभावशाली ठरले. कमी उष्मा वाहकता असल्यामुळे एएसी ब्लॉक्स उष्णतेचे कमी हस्तांतरण करून तापमान कमी ठेवतात. त्यामध्ये अन्य बांधकाम साहित्य मिसळल्यास ते अधिक मजबूत होत असल्याचे अभ्यासाच्या मुख्य लेखिका आणि आयआयटी मुंबईच्या पीचडी विद्यार्थिनी, तृप्ती सिंग राजपूत यांनी सांगितले.