IIT Mumbai : मोदी-योगी-शहांविरोधातील कार्यक्रमातून आयआयटी मुंबईची माघार

भांडवलशाहीवरील कार्यशाळा; समाजमाध्यमांवरील टीकेनंतर परिपत्रक काढत आयआयटीचे स्पष्टीकरण
IITB political controversy
मोदी-योगी-शहांविरोधातील कार्यक्रमातून आयआयटी मुंबईची माघार pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : बर्कले विद्यापीठात युसी बर्कले आणि मॅसॅच्युसेट्स-अ‍ॅमहर्स्ट विद्यापीठाच्या सहकार्याने तरुणांसाठी दक्षिण आशियाई भांडवलशाहीवरील कार्यशाळेच्या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमा होत्या. या प्रतिमांखाली ‘आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो’ असे उपशीर्षक होते.

या कार्यक्रमामध्ये आयआयटी मुंबई सहभागी झाली होती. मात्र यावर समाजमाध्यमांवर झालेल्या जोरदार टीकेनंतर आयआयटी मुंबईने या कार्यक्रमातून माघार घेण्याचा निर्णय घेत सर्व समाज माध्यमांवरील सर्व पत्रके काढून टाकण्यात आली आहेत.

‘दक्षिण आशियाई भांडवलशाही’ या विषयावरील कार्यशाळेचे बर्कले विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये दक्षिण आशियातील भांडवलशाही रचनेचा पिरॅमिडचा आराखडा दाखवणार्‍या पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमा होत्या आणि त्यावर ‘आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो’ असे उपशीर्षक होते.

हर्षिल मेहता याने हे पत्रक समाजमाध्यमांच्या माध्यमातून सर्वांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे समाजमाध्यमांवर या पत्रकाचा व आयआयटी मुंबईचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. आयआयटी मुंबईसारखी संस्था अशा घटनांमध्ये कशी सहभागी होऊ शकते, असा प्रश्नही उपस्थित केला. यानंतर आयआयटी मुंबईने या कार्यक्रमातून माघार घेतल्याचे जाहीर करत आयोजकांना समाजमाध्यमांवरून हे पत्रक काढण्यास सांगितले.

IITB political controversy
Mumbai Municipal Corporation | शिवसेना शिंदे गटाची मुंबईत 125 जागा लढण्याची इच्छा
  • दक्षिण आशियाई भांडवलशाहीवरील कार्यशाळा ही आयआयटी मुंबईच्या न्यू पॉलिटिकल इकॉनॉमिक इनिशिएटिव्हच्या प्रकल्पाशी संबंधित होती. मात्र प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाबाबत आयोजकांकडून पूर्णपणे माहिती दिली नव्हती. समाजमाध्यमावर पत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर ती संस्थेच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयोजकांना सर्व समाजमाध्यमांवरून हे पत्रक काढून टाकण्याचे आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्व गोष्टींमधून आयआयटी मुंबईचे नाव काढून टाकण्याचे तात्काळ निर्देश दिले.

  • या कार्यक्रमाची माहिती न्यू पॉलिटिकल इकॉनॉमी इनिशिएटिव्हच्या संकेतस्थळावरूनही तात्काळ काढली आहे. आयआयटी मुंबईमधील कोणीही परिषदेला उपस्थित राहिलेले नाही. या पत्रकाबद्दल संस्थेशी आयोजकांनी चर्चा केली नव्हती. पत्रकातील मजकुरामुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे. त्यामुळे यापुढे यूसी बर्कले आणि मॅसॅच्युसेट्स-अ‍ॅमहर्स्ट विद्यापीठातील प्राध्यापकांशी आयआयटी मुंबईकडून कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल, असे आयआयटीने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news