Riya Barde | बांगलादेशी पोर्न स्टार रियाचा पर्दाफाश कसा झाला ? जाणून घ्या

उल्हासनगर पोलिसांकडून अटक
Riya Barde  porn star case
पोर्न स्टार रिया बर्डे मूळची बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात पोर्न स्टार म्हणून काम करणारी रिया बर्डे (Riya Barde) मूळची बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सखोल चौकशीअंती महाराष्ट्र पोलिसांनी तिचा पर्दाफाश करून तिला अटक केली आहे. पॉर्न इंडस्ट्रीत (Riya Porn Star Case) रियाला आरोही बर्डे किंवा बन्ना शेख या नावानेही ओळखले जात होते. महाराष्ट्रातील उल्हासनगर येथील हिललाइन पोलिसांनी रियाला बनावट कागदपत्रांद्वारे भारतात राहिल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया (Riya Porn Star Case) ही मूळची बांगलादेशी असून आई, भाऊ आणि बहीणीसोबत ती बनावट कागदपत्रे बनवून भारतात बेकायदेशीरपणे राहत आहे. बांगलादेशी असल्याने रियाच्या आईने भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केले होते. सध्या पोलिसांनी या प्रकरणात रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ ​​रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ ​​रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ ​​मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे.

रियाच्या आईने रचला कट?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी असून ती आपल्या दोन मुली रिया आणि मुलासह भारतात अवैधरित्या राहत होती. रियाच्या आईने अमरावती येथील रहिवासी असलेल्या अरविंद बर्डे याच्याशी विवाह केला. तो पश्चिम बंगालचा असल्याचा दावा केला. आणि त्यानंतर स्वत: आणि तिच्या मुलांसाठी बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकाचा पासपोर्ट मिळविला. जेणेकरून आपली भारतीय ओळख सिद्ध होऊ शकेल.

रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याच्याकडून तक्रार 

पोलिसांनी केलेल्या तपासात पॉर्न स्टार रियाचे (Riya Porn Star Case) आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. तर पोलीस त्याच्या भावाचा आणि बहिणीचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, रियाला यापूर्वी मुंबई पोलिसांनी वेश्या व्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अटक केली होती. रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशची असून बेकायदेशीररीत्या देशात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.

Riya Barde  porn star case
Riya Kumari : अभिनेत्री-यूट्यूबर इशा आलियाची गोळ्या झाडून हत्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news