Code Of Conduct | आचारसंहिता किती दिवसांची असेल ?

आचारसंहिता किती दिवसांची असेल ?
Code Of Conduct
आचारसंहिता किती दिवसांची असेल ?pudhari
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होईल, आचारसंहितेचा कालावधी किती असेल, याबाबत सध्या उत्सुकता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे तत्कालीन आयुक्त टी. एन. शेषन यांनी ९० दिवसांची निवडणूक आदर्श आचारसंहिता आणली होती. नंतरच्या काळात तो कालावधी कमी होऊन ३० दिवसांवर आला आहे.

आचारसंहिता म्हणजे काय ?

  1. देशात स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.

  2. • निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य आहे.

  3. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते,

  4. • आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल, तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो.

अंमलबजावणी सर्वप्रथम कधी ?

  • १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर १९६७ च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले.

  • २००४ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा २४ ऑगस्टला झाली. तेव्हा आचारसंहिता ४५ दिवसांवर आणली गेली.

  • २००९ च्या विधानसभेची घोषणा ३१ ऑगस्ट २००९ रोजी झाली. ही आचारसंहिता ३० दिवसांची होती.

  • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १२ सप्टेंबर २०१४ ला झाली. मतदान १५ ऑक्टोबरला झाले. मतमोजणी १८ ऑक्टोबरला झाली.

  • २०१९च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा २० सप्टेंबरला झाली होती. २१ ऑक्टोबरला मतदान आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news