HMPV Virus | आईचे दुध 'एचएमपीव्ही' पासून करते लहान मुलांचे रक्षण

बालरोग तज्ज्ञांचा सल्ला
HMPV Virus
HMPV Virus | आईचे दुध 'एचएमपीव्ही' पासून करते लहान मुलांचे रक्षणFile Photo
Published on
Updated on

मुंबई : HMPV Virus | एचएमपीव्ही व्हायरसची लागण आतापर्यंत लहान मुलांनाच झाली आहे. पण मुलांना आईचे दूध दिल्यास या व्हायरसपासून संरक्षण मिळू शकते, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मातांनी आपल्या नवजात बालकांना बाहेरील दुधाऐवजी स्तनपान करावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बंगळुरू, अहमदाबाद आणि नागपूरनंतर मुंबईतही एचएमपीव्ही एमपीव्हीची प्रकरणे आढळून आली आहेत. मुंबईत सहा महिन्यांच्या मुलीला संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे पाहता एचएमपीव्हीच्या धोक्यामुळे मातांची चिंता वाढली आहे. बालरोग, संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. झहाबिया बागवाला यांनी सांगितले की, आईच्या दुधात लैक्टोफेरिन, इम्युनोग्लोब्युलिन, फ्री ऍसिडस् आणि अँटीबॉडीज सारखे घटक असतात जे एचएमपीव्हीसह विविध श्वसन संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी असतात. करू शकत नसेल तर तिने ते दूध काढून बाळाला द्यावे. आईचे दूध हे एचएमपीव्ही विषाणूपासून लहान मुलांसाठी संरक्षणात्मक कवच आहे. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ्ज डॉ. यू. आशा दलाल यांनी सांगितले की, नवजात बालकांसाठी स्तनपान ही 'जीवनाची पहिली लस' मानली जाते. कारण आईच्या दुधात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे अनेक महत्त्वाचे घटक असतात. आईचे दूध केवळ एचएमपीव्ही विषाणूपासूनच नव्हे तर सिस्टिक फायब्रोसिस इत्यादी आजारांपासूनही मुलांचे संरक्षण करते.

आईचे दुध बाळासाठी वरदान

लॅक्टोफेरिन प्रथिनेयुक्त हा घटक विषाणूंसाठी प्रतिबंध ठरतो. इम्युनोग्लोब्युलिन हे ऍन्टीबॉडीज श्वसन रोगजनकांच्या क्रियेत अडथळा आणतात. फ्री फॅटी ऍसिडस् हे घटक विषाणूना नष्ट करण्यास मदत करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news