आचारसंहितेने वाढवली सराफा व्यापाऱ्यांची डोकेदुखी

३५० कोटींचे सोने लॉजिस्टिक कंपन्यांमार्फत राज्यभरात दररोज होते पोहोच
Gold Prices Today
आचारसंहितेने वाढवली सराफा व्यापाऱ्यांची डोकेदुखीfile photo
Published on
Updated on

नवी मुंबई : राजेंद्र पाटील | आचारसंहितेचा भाग म्हणून महामार्गावर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या कारवाईमुळे सोने वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची सुरक्षा धोक्यात आली असून सराफा व्यावसायिक अडचणीत आल्याचा सूर राज्यभरातील व्यावसायिकांमधून उमटत आहे.

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूक तर दुसरीकडे दिवाळी सण एकत्र आला आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जाते. राज्यात दररोज अंदाजे ६० ते ७० टन म्हणजेच २५० ते ३५० कोटींचे सोने बुकींगनुसार ठिकठिकाणच्या सराफांकडे पोहोचवले जाते. जे सराफ सोने खरेदी करतात ते मालाची रक्कम जमा करून देशभरात सोने वाहतूक करणाऱ्या बीव्हीसी आणि सिकवेल या दोन नामांकित लॉजिस्टिक कंपन्यांमार्फत आणि काही व्यापारी अंगडीयामार्फत सोने पोहोचविण्याची व्यवस्था करतात. त्यासाठी वाहतूक करणाऱ्या कंपनीकडे सोने खरेदीची कागदपत्रे, विमा, जीएसटी भरल्याच्या पावत्या वाहतूकदार कंपन्यांकडे देतात. त्यानुसार प्रामुख्याने पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, औरंगाबाद, मराठवाडा, खान्देशात दररोज सोने पोहोचवले जाते. ही वाहतूक करताना कुठल्या वाहनातून, कंटेनरमधून किंवा कंपनीमार्फत सोने वाहतूक होते. याची गुप्तता पाळली जाते. मात्र गेल्या तीन दिवसांपूर्वी पुणे-कात्रज येथे १३८ कोटींचे सोने तपासणीदरम्यान पकडले गेले आणि उलटसुलट चर्चांना उधाण आले. या कारवाईदरम्यान ज्या कंटेनरला पकडले, त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे असताना त्या वाहनाला तपासणीनंतर सोडले नाही. याची गांभीर्याने दखल घेत फत्तेचंद रांका यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांची भेट घेत सोने वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची नावे उघड केल्याने आमची सुरक्षा धोक्यात आल्याची माहिती प्रशासनाला देत कारवाई थांबवण्याची विनंती केली. याबाबत निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन असोसिएशनला देण्यात आले.

जीएसटी पोर्टलवर मालाची नोंद केल्याची पावती, विमा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे असल्याशिवाय सोन्याची वाहतूक होत नाही.

- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, सराफ असोशिएशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news