उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी शासनाकडून 30 जूनपर्यंत मुदतवाढ

'या' गाड्यांना नवीन नंबरप्लेट लावण्याची गरज नाही
high-security-number-plate-deadline-extended-till-june-30
वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट सक्तीचीPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात एचएसआरपी बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी वाहन मालकांना 31 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अर्थात, 1 एप्रिल 2019 नंतर ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन असेल, त्या वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवायची गरज भासणार नाही. विधिमंडळात मंगळवारी या विषयावरून जोरदार चर्चा झाली होती. या नंबरप्लेट बसविण्यासाठी उपलब्ध असलेल्या संकेतस्थळांवरून ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला होता. त्याची गंभीर दखल घेऊन शासनाने यासंदर्भात मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना या नव्या नंबरप्लेट बसविण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे.

कोणत्या नंबर प्लेटसाठी किती शुल्क?

दुचाकी, ट्रॅक्टर 450

तीनचाकी 500

चारचाकी व अन्य 745 ते 1200

कमर्शियल वाहन 1500 ते 2000

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news