शिना बोरा खून खटला : इंद्राणी मुखर्जीला भारत सोडता येणार नाही - मुंबई उच्च न्यायालय

सत्र न्यायालयाचा निर्णयाला CBIने दिले होते आव्हान
Indrani Mukerjea
इंद्राणी मुखर्जी हिच्यावर शिना बोरा हिचा खून केल्याचा आरोप आहे.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला भारत सोडून जाता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील आदेश पारित केली आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी हिला परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने अपील दाखल केले होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी हा निकाल दिला आहे.

इंद्राणी मुखर्जी हिच्यावर तिची मुलगी शिना बोरा हिचा खून केल्याचा आरोप आहे. खुनाची ही घटना २०१२ला घडली होती. इंद्राणी मुखर्जीला या प्रकरणी जामीन मिळालेला आहे. त्यानंतर तिने परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. तिला ३ महिन्यांच्या कालावधीत १० दिवस लंडन आणि स्पेनमध्ये जाण्याची परवानगी सत्र न्यायालयाने दिली होती. ही बातमी बार अँड बेंचने दिलेली आहे.

'इंद्राणी मुखर्जीला परदेशात जायची गरज नाही'

लंडनमधून इंद्राणीच्या वकिलांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मृत्यूपत्रात दुरुस्ती करणे, करासंदर्भातील विषय आणि बँकेतील जॉईंट खाते पुन्हा सुरू करणे अशा कामांसाठी तिला या देशांत जावे लागणार आहे, असे तिच्या वकिलांनी म्हटले होते.

पण सीबीआच्या वकिलांनी सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या निकालावर आक्षेप नोंदवले. इंद्राणी हिला या कामांसाठी परेदशात जाण्याची गरज नाही, कारण यांची पुर्तता ती भारतातून करू शकते, असे वकिलांनी सांगितले.

Indrani Mukerjea
हायप्रोफाइल शीना बोरा हत्याकांड: इंद्राणी मुखर्जी म्हणतेय ‘ती जिवंत आहे’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news