

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात (Akshay Shinde Encounter) संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई हाय कोर्टाने आज (दि.७) दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे सह आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखेखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. (Mumbai High Court)
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्व बाजूंनी चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने आदेशावर स्थगितीची मागणी केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची ही मागणी फेटाळून लावली आहे.