Harbour Line Disruption : ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेचा खोळंबा

चेंबूर-टिळकनगर स्थानकांदरम्यान ओव्‍हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल
Harbour Line Disruption
ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेचा खोळंबा pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी गर्दीच्या वेळेत मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. चेंबूर-टिळक नगर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचइ) वायर तुटल्याने हार्बर मार्गावर लोकल खोळंबा झाला. त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसला.

साधारण सकाळी ९.१६ वाजता वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे थांबविण्यात आली होती. त्यामुळे अनेक लोकल गाड्या स्थानकात अडकून पडल्या होत्या. एकामागोमाग एक लोकल रुळांवर उभ्या होत्या. संपूर्ण हार्बर मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. सकाळी गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

Harbour Line Disruption
Pen development: तिसऱ्या मुंबईचा वेगवान विकास, पण पेण-पनवेल थेट लोकलची प्रतीक्षाच

दीर्घकाळ वाट पाहून सुद्धा लोकल सुरू न झाल्याने अनेक प्रवाशांना थेट रुळांवर उतरून जवळच्या स्थानकापर्यंत पायपीट केली. काही स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना माहिती देत होते. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर तांत्रिक पथकानी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली. त्यानंतर सकाळी ९.५२ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.

Harbour Line Disruption
Dombivli Local Train | तांत्रिक विभागाकडून युद्धपातळीवर काम; डोंबिवलीत विस्कळीत लोकल सेवा पूर्ववत सुरू

एसी लोकल रद्द

हार्बर रेल्वेच्या खोळंब्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेलापूर अशी दुपारी १ वाजून ७ मिनिटांची आणि वडाळा ते पनवेल अशी १ वाजून १७ मिनिटांची एसी लोकल कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात आली. त्यामुळे या रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्यांनी नाराजी व्‍यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news