

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावर रविवार (13 जुलै) मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सीएसएमटी-वाशी-बेलापूर-पनवेल अप आणि डाऊन या दोन्ही दिशेकडील लोकलसेवा पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना व्हाया ट्रान्स हार्बर मार्गाने ठाणे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी मेगाब्लॉक नाही.
सीएसएमटीहून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत वाशी बेलापूर, पनवेलला जाणारी डाऊन सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 पर्यंत सीएसएमटीकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी -कुर्ला आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालवल्या जातील. ठाणे-वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत प्रवास करता येईल.
विद्याविहार ते ठाणे
सकाळी 8.00 ते दुपारी 1.30 पर्यंत
कुर्ला ते वाशी
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10
डाऊन मेल व एक्सप्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवण्यात येतील आणि ब्लॉक कालावधीत 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.
अप मेल, एक्सप्रेस (सीएसएमटीला जाणारी) गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ब्लॉक कालावधीत त्या10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
एलटीटी-गोरखपूर
एलटीटी-जयनगर पवन
एलटीटी-तिरुवनंतपुरम नेत्रावती
एलटीटी-काकीनाडा
पुणे-सीएसएमटी सिंहगड
पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
पुणे-सीएसएमटी प्रगती
नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम
सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत
हावडा-सीएसएमटी मेल
धुळे-सीएसएमटी
पाटणा-एलटीटी
काकीनाडा-एलटीटी
बनारस-एलटीटी सुपरफास्ट
हटिया-एलटीटी