Hand Transplant | विजेच्या धक्क्याने गमावलेल्या हाताचे प्रत्यारोपण

अवयवदानातून मुंबईतील १३ वर्षीय मुलीला मिळाले नवे आयुष्य
hand-transplant-electric-shock-injury
संग्रहित फोटो file photo
Published on
Updated on

मुंबई : दोन वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये विजेचा धक्का लागल्याने अनमता अहमद या १३ वर्षीय मुलीला उजवा हात तिला गमवावा लागला होता. तब्बल दोन वर्षांनंतर सुरतच्या ९ वर्षीय ब्रेन डेड मुलीच्या हाताचा वापर करून परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये अनमताच्या हाताचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. हात प्रत्यारोपण करणारी ही मुलगी आशियातील सर्वात तरुण अवयव प्राप्तकर्ता ठरली आहे.

मुंबईतील गोरेगाव येथे राहणारी १५ वर्षीय अनमता अहमद ही सुट्टयांमध्ये उत्तर प्रदेशातील अलीगड येथील तिच्या गावी गेली होती. चुलत भावांसोबत खेळत असताना तिचा चुकून छतावरील विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यामुळे तिला विजेचा जोरदार झटका बसला आणि ती गंभीररित्या भाजली. तिच्या उजव्या हाताला गँगरीन झाले आणि तीनवेळा शस्त्रक्रिया करावी लागली. तर डाव्या हातालाही गंभीर दुखापत झाली होती.

हात प्रत्यारोपण ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया आहे. प्राथमिक दुखापतीमुळे त्वचा, रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूवर गंभीर जखम पहायला मिळतात. याचे आधीच आकलन करून त्यानुसार नियोजन करावे लागते. उच्च स्तरावरील प्रत्यारोपणामध्ये हाड व्यवस्थित रोपण करणेदेखील एक आव्हान आहे. अनमताच्या बाबतीत, दुखापत जवळजवळ खांद्याच्या भागात असल्याने, आम्हाला रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू क्लॅव्हिकलच्या खाली दुरुस्त कराव्या लागल्या.

- डॉ. निलेश सतभाई

हात गमावूनही या धाडसी मुलीने आशा सोडली नव्हती. ती डाव्या हाताने लिहायला शिकली, एवढेच नाही तर दहावीच्या परीक्षेत तिचे ९२ टक्के गुण संपादन केले. तिने मे २०२४ मध्ये तिच्या शाळेत ९८ गुण मिळवून हिंदीत प्रावीण्य मिळवले. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला देशातील अनेक रुग्णालयात नेले. सिंगापूर आणि थायलंडमधील काही डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र सर्व ठिकाणी हात प्रत्यारोपणास नकार देण्यात आला. पण ग्लेनईगल्स हॉस्पिटलमधील प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरीचे डॉ. निलेश सतभाई यांना भेटल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

अखेर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर या मुलीला सुरत येथील एका ब्रेनडेड मुलीच्या मदतीमुळे हात मिळाला आणि तिला नवीन आयुष्य मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news