

मुंबई : राज्यात मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह गारपीट अन् पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशात या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा अंदाज आहे. वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.
रविवारी राज्यातील तापमानात किंचित घट झालेली दिसून आली. विदर्भातील अकोला शहरात 44.3 अंश तापमानाची नोंद झाली, तर पुणे शहराचा पारा 38 अंशांपर्यंत खाली आला होता. ईशान्य अरबी समुद्र आणि लगतच्या गुजरातच्या किनार्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.त्यामुळे देशातील सर्वच भागांत सोमवार (दि. 5) ते शनिवार (दि. 10 मे) दरम्यान पावसाचा अंदाज आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंडमध्ये काही ठिकाणी वार्याचा वेग ताशी 70 ते 100 कि.मी. असणार आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणामध्ये वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.