राज्यात बंदी असूनही सर्रास ठिकाणी गुटखा मिळतो: विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | गुजरात मार्गे महाराष्ट्रात गुटखा येतो
 Vijay Wadettiwar  illegal sale   Gutkha
काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: राज्यात गुटख्यावर बंदी असताना देखील सगळीकडे गुटखा सर्रासपणे उपलब्ध आहे. याबाबत कठोर कारवाई होत नाही, अशी लक्षवेधी काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनात मांडली. यावर गुटखा व्यापारी, विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

वडेट्टीवार म्हणाले की, इतर राज्यात गुटखा बंदी नाही, पण महाराष्ट्रात बंदी असताना मात्र गुटखा सगळीकडे उपलब्ध आहे. गुजरात मार्गे महाराष्ट्रात गुटखा येताना कारवाई नाही. यामुळे सरकारचा महसूल बुडतो. हा गुटखा येतो , पोलिसांनी मनात आणले तर एक ही पुडी विकू शकत नाही. पण तरीही विदर्भ, मराठवाडा इथे गुटखा मिळतो, लोकांच्या आरोग्याला यामुळे हानी पोहचते.

यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी गुटख्या बाबत अन्न आणि प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. या विभागात फूड ऑफिसर्सची कमतरता आहे. पण दोन महिन्यांत या नियुक्त्या करण्यात येतील आणि गुटखा विक्रीवरील कारवाया वाढविल्या जातील. या प्रकरणी कोणताही व्यापारी, विक्रेते ,पुरवठादार असो त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री कदम यांनी दिले.

 Vijay Wadettiwar  illegal sale   Gutkha
बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला आवरा : विजय वडेट्टीवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news