

पुढारी ऑनलाईन डेस्कः गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पालकमंत्रीपदांची यादी सरकारने जाहीर केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री स्वीकारले आहे. पुण्याबरोबरच संतोष देशमुख हत्याप्रकरणी चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्रीपद असणार आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्रीपद आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि माधूरी मिसाळ यांना विभागून देण्यात आले आहे. तसेच शंभुराज देसाई यांना सातारा, आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद कायम राहिले आहे.
गडचिरोली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री)
ठाणे , मुंबई शहर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर ,अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
वाशीम- हसन मुश्रीफ
सांगली - चंद्रकांत(दादा) पाटील
रायगड- आदिती तटकरे
आहिल्यानगर- राधाकृष्ण विखे-पाटील
नाशिक - गिरीश महाजन
पालघर- गणेश नाईक
जळगाव- गुलाबराव पाटील
यवतमाळ- संजय राठोड
मुंबई उपनगर- आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा
रत्नागिरी- उदय सामंत
जालना- पंकजा मुंडे
सातारा- शंभूराज देसाई
कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, माधूरी मिसाळ (सहपालकमंत्री)
लातूर- शिवेंद्रसिंहराजे भोसले
सोलापूर- जयकुमार गोरे
छत्रपती संभाजी नगर- संजय शिरसाट
धुळे - जयकुमार रावल
सिंधुदुर्ग- नितेश राणे
हिंगोली - नरहरी झिरवळ
बुलढाणा- मकरंद जाधव -पाटील
अकोला - आकाश फुंडकर
नांदेड- अतुल सावे
चंद्रपूर - अशोक उईके
वर्धा - पंकज भोयर
परभणी - मेघना साकारे- बोर्डिकर
धाराशिव - प्रताप सरनाईक
गोंदिंया - बाबासाहेब पाटील
भंडारा - संजय सावकारे
नंदूरबार - माणिकराव कोकाटे