Green Energy Generation | हरित ऊर्जानिर्मितीसाठी ४७ हजार कोटींचे करार

राज्यात १८ हजारांवर रोजगारनिर्मिती होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र डणवीस
deputy cm Devendra Fadanvis Green Energy Generation
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील ४ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.Pudhari
Published on
Updated on

मुंबई : हरित ऊर्जा क्षेत्रातील एकूण चार कंपन्यांसमवेत राज्य सरकारतर्फे ४७ हजार ५०० कोटींचे सामंजस्य करार गुरुवारी करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. या सामंजस्य करारांमुळे १८ हजार ८२८ रोजगारनिर्मिती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री फड़णवीस यांनी सांगितले.

आरईसीपीडीसीएल-आरईसी, टीए‌चडीसी आयएल टीएचडीसी, एचपी आर जीई-एचपीसीएल, एसजेवीएन या हरित ऊर्जा क्षेत्रातील चार प्रमुख कंपन्यांसोबत राज्य सरकारने हे करार केले आहेत. सन २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. सन २०३० पर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले असल्याचेही ते म्हणाले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारावर महानिर्मितीतर्फे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगन व एसजेव्हीएन तर्फे सुशील शर्मा, महाजनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेडतर्फे अभय हरणे संचालक (प्रकल्प) यांनी तर आरईसीपीडीसीएल तर्फे सरस्वती चीफ प्रोग्रॅम मॅनेजर, एचपीआरजीई तर्फे शुर्वेद् गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टीएचडीसी तर्फे भुपेंदर गुप्ता संचालक (तांत्रिक) यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

५०० मेगावॅटचा हायब्रिड प्रकल्प

आरईसीपीडीसीएल-आरईसी (RECPDCL-REC) पॉवर डेव्वालपमेंट आणि कन्सल्टन्सी लिमिटेड यांच्यासमवेत सामंजस्य करार केल्यामुळे आरईसीपीडीसीएल सोबतच्या ५०० मेगावॅट पुनर्नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी १ हजार ६६३ रोजगारनिर्मिती होणार असून या प्रकल्पासाठी रु. ३ हजार कोटी इतकी गुंतवणूक असणार आहे. मुख्यतः रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांच्या विकासासाठी प्रकल्प/ पायाभूत सुविधा विकास आणि अभियांत्रिकी / उत्पादनातील मुख्य शक्तींचा लाभ घेण्यासाठी एकत्र काम करणे, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासाला गती लागेल.

तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

एसजेव्हीएन महाजेनकोसोबत संयुक्त उपक्रमात लोअर वर्षा धरणावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाच्या विकासाचा विचार करीत आहे. या संयुक्त उपक्रम कंपनीत एसजेव्हीएन आणि महाजेनको यांच्यात ५१:४९ इक्विटी सहभाग असेल. लोअर वर्धा येथे ५०५ मेगावॅट तरंगता सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी ७३२ हेक्टर जागा प्रस्तावित केली आहे. वीज वाहतुकीच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्वतेचा विचार करता, प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित केला जाऊ शकतोः टप्पा-१० १०० मेगावॅट आणि टप्पा-२-४०५ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पातून १ हजार ४०० रोजगारनिर्मिती होणार असून या प्रकल्पात ३ हजार ३० कोटी गुंतवणूक असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

४,२५० मेगावॅट पुनर्नवीकरणीय प्रकल्प

टीएचडीसीआयएल टीएचडीसी (THDCIL THDC) इंडिया लिमिटेड कंपनी समवेत झालेल्या सामंजस्य करारामुळे ४ हजार २५० मेगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांचा विकास करण्यात येणार आहे. ४ हजार २५० मेगावॅट पुनर्नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून १४ हजार १३० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असून या प्रकल्पात २९ हजार ३२९ कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे.

ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचा विकास

एचपीआरजीई एचपीसीएल (HPRGE- HPCL) रिन्युएबल आणि ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी समवेत झालेल्या सामंजस्य करारामुळे जीटीपीएस (GTPS), उरण येथे ५० केटीपीए (KTPA) ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह प्लांटचा विकासाला गती प्राप्त होणार आहे. एचपीआरवीई (HPRGE) सोबतव्या ५० केटीपीए हरित हायड्रोजन प्रकल्यांच्या विकासासाठी १ हजार ६३५ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पात १२ हजार कोटी इतकी गुंतवणूक असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news