Goregaon Crime : गोरेगावात शोभायात्रेत राडा

बजरंग दलाचे तिघे जण जखमी; एकाच कुटुंबातील दहाजणांना अटक
Goregaon Santosh Nagar clash
मुंबई : मरीयम्मा मिरवणुकीआधीच महापालिका अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार होती. मात्र, राडा झाला आणि बजरंग दल हटून बसल्याने शेवटी जेसीबी फिरवावा लागला. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : गोरेगाव येथील संतोषनगर परिसरात मरियम्मा देवीच्या शोभायात्रेत आवाजावरुन झालेल्या वादातून दोन गटात प्रचंड राडा झाला. रविवारी रात्री झालेल्या मारामारीत बजरंग दलाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले तर एकाच कुटुंबातील दहाजणांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आणि दंगलीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी फिरवण्यात आला.

गोरेगावच्या संतोषनगर परिसरात काही अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. हे बांधकाम तोडण्यसाठी मनपा कर्मचारी घटनास्थळी गेले असता प्रचंड तणाव निर्माण झाला. तेवढ्यात निघालेल्या मरियम्मा देवीची शोभायात्रा तिथे पोहोचली. मिरवणुकीचा आवाज मोठा असल्याने तो कमी करण्याची मागणी एका गटाने केली आणि त्यावरून शाब्दिक चकमक उडाली. त्यातून दोन गटांत हाणामारी झाली होती.

Goregaon Santosh Nagar clash
Vasai-Virar Flood Solution: वसई-विरार शहराला पुराच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

एका गटाने म्युझिक सिस्टीमची तोडफोड केल्याने त्यात अधिकच भर पडली. मग दोन्ही गटांकडून एकमेकांवर काठीसह तलवारीने हल्ला करण्यात आला. बजरंग दलाचे तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांवर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती बजरंग दल कोकण प्रांतचे सहसंयोजक गौतम रावारीया यांनी दिली. यामुळे बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेत आरोपींच्या अतिक्रमणावर बुलडोझर फिरवण्याची मागणी केली आणि ठिय्या आंदोलन सुरू केले.

Goregaon Santosh Nagar clash
Clay Pot Water Cooling:आधुनिक फ्रिजलाही टक्कर देणारी मातीची मडकी; मुरबाडमध्ये पारंपरिक ‘कूलिंग’ची वाढती क्रेझ

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी एकाच कुटुंबातील दहाजणांना अटक केली. अटकेतील आरोपीने संतोषनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आले. ते बांधकाम पाडण्यासाठी मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी बुलडोझर घेऊन आले होते. त्यानंतर शोभायात्रेत लाऊडस्पिकरवरुन झालेला वाद आधीच्या तणावात भर घालणारा ठरला. शेवटी आरोपीच्या घरासमोरील अनधिकृत शेडवर सोमवारी जेसीबी फिरवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news