College student ends life : गोरेगावात 23 व्या मजल्यावरुन उडी घेऊन कॉलेज तरुणीने जीवन संपवले

अभ्यासाच्या ताणातून नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचे उघड
College student ends life
गोरेगावात 23 व्या मजल्यावरुन उडी घेऊन कॉलेज तरुणीने जीवन संपवले File Photo
Published on
Updated on

मुंबई : गोरेगाव येथील एका निवासी इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने उडी घेऊन जीवन संपवले . अभ्यासाच्या ताणातून तिने नैराश्यातून जीवन संपवल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवून आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. सतरा वर्षांची ही मुलगी गोरेगाव येथील आरे कॉलनीतील ओबेरॉय स्क्वेअर सोसायटीच्या ए विंग, फ्लॅट क्रमांक 205/2306 मध्ये तिच्या पालकांसोबत राहत होती. तिचे वडिल व्यावसायिक असून ती एका नामांकित कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून तिने अभ्यासाचा प्रचंड प्रेशर घेतला होता. त्यातून तिला मानसिक नैराश्य आले होते. तिची प्रकृती बिघडत असल्याने तिच्यावर धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र त्यातून तिला काहीच फरक जाणवत नव्हता.

गुरुवारी ती तिच्या बेडरुममध्ये होती. दुपारी साडेतीन वाजता तिने तिच्या 23 व्या मजल्यावरील बेडरुममधून उडी घेतली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशाकडून तिच्या पालकांना समजातच त्यांनी तिला तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिच्या वडिलांच्या जबानीनंतर ती अभ्यासामुळे मानसिक नैराश्यात असल्याचे उघडकीस आले. तिने यापूर्वीही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.

गुरुवारी तिने इमारतीवरुन उडी घेऊन अखेर स्वतच्या जीवनाचा शेवट केला होता. त्यांनी तिच्या जीवन संपवण्याबाबत कोणाविरुद्ध तक्रार केली नाही किंवा संशय व्यक्त केला नव्हता. त्यामुळे शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या पालकांना सोपविण्यात आला. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या मुलीच्या जीवन संपवण्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news