Gopichand Padalkar | 'गोपीचंद पडळकरांच्या भावानं माझी १७ एकर जमीन हडप केली', ८२ वर्षीय आजी थेट विधानभवनात धडकल्या, नेमकं प्रकरण काय?

गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्याच गावातील आजीची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे
Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर यांच्यावर जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Pudhari News)
Published on
Updated on

Gopichand Padalkar News

मुंबई : जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या भावाने त्यांच्याच गावातील विठाबाई पडळकर या ८२ वर्षीय आजीची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तसा आरोप सदर आजीने केला आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. ३ जुलै) या आजीचे कुटुंबीय विधानभवनच्या बाहेर आले होते.

या आजीची १७ एकर जमीन ही गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर याने फसवणूक करून हडप केली असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी आपल्याला मदत न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी या कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.

Gopichand Padalkar
NCP youth Congress Meeting | ...तर 'करेक्ट कार्यक्रम' करणाऱ्यांचाच करेक्ट कार्यक्रम झाला असता; सुरज चव्हाणांचा जयंत पाटलांना थेट इशारा
Gopichand Padalkar
विठाबाई पडळकर यांनी आपली जमीन हडप केल्याबद्दल आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे.(Pudhari Photo)

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, विठाबाई पडळकर यांनी याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. कैलास वाघमारे (ता. आटपाडी) यांनी माझी फसवणूक करुन माझी शेतजमीन हडप केल्याचे विठाबाईंनी म्हटले आहे. माझ्या पतीचे १० वर्षापूर्वी निधन झाले आहे. माझे वय ८२ वर्षे असून मला लिहिता, वाचता येत नाही. माझे दोन्ही दीर मयत असून आमचे एकत्र कुटुंब आहे. आमच्या शेतजमिनीचे वाटप झालेले नाही. माझा सांभाळ माझे पुतणे करतात. आणेवारीत माझ्या नावे १७ एकर जमीन आहे. ही जमीन माझे पुतणे कसतात. पण ही जमीन फसवणुकीने हडप केल्याचा आरोप विठाबाईंनी आटपाटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

Gopichand Padalkar
Sangli : नियमित कर्जदार शेतकर्‍यांना अनुदान नाहीच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news