Ghatkopar Midday Meal Incident: घाटकोपरमधील शाळेत धक्कादायक प्रकार; मध्यान्ह भोजनात काच!

निकृष्ट खिचडीबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंकडे तक्रार
Ghatkopar Midday Meal Incident
Ghatkopar Midday Meal IncidentPudhari
Published on
Updated on

घाटकोपर: घाटकोपर पूर्व येथील महापालिकेच्या पंतनगर शाळा क्र. ३ मध्ये मध्यान्ह भोजनात काच आढळल्याने पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच शुक्रवारी मुंबई मनपामधील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर शाळेत पोहोचल्या.

या प्रकरणाबाबत त्यांनी येथील संबंधित अधिकाऱ्यांची झाडझडती घेतली. येथील खिचडी खाऊन पाहीली आणि तिचा दर्जा पाहून थेट अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना कॉल लावत तक्रार केली.

Ghatkopar Midday Meal Incident
Social Media Scam: समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या महिलेला ९० हजारांचा गंडा

३० रोजी या शाळेत आलेल्या मध्यान्ह भोजन जे श्रुती महिला बचत गट गृह उद्योग संस्था यांच्या माध्यमातून येते त्याच्या खिचडीमध्ये सहावीच्या विद्यार्थ्याला काच लागली. त्याने याची माहिती शिक्षक विकास घुगे यांना दिली.

विकास घुगे यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली असता त्यांना धमकावल्याचा आरोप घुगे यांनी केला. विकास घुगे यांनी त्या काचेचे फोटो काढले व याची माहिती विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना दिली.

त्या नगरसेवक साईनाथ दुर्गे, विधानसभा समन्वयक इम्रान शेख, प्रकाश वाणी व इतर पदाधिकाऱ्यांसह या शाळेत झाडझाडती घेण्यास पोहोचल्या. त्या आल्या तेव्हा येथे ठेवलेल्या मध्यान्ह भोजनाजवळ त्यांना कोणीही आढळले नाही.तसेच त्यांनी खिचडी खाऊन पाहिली असता यातील सोयाबीन चॉप्स कच्चे असल्याचे आणि तांदूळही बरोबर नसल्याचे आढळले.

Ghatkopar Midday Meal Incident
Central Railway Mega Block: मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक; अनेक लोकल गाड्या उशिराने धावणार, काही रद्द

याबाबत त्यांनी संताप व्यक्त करत थेट अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनाच फोन करून या प्रकरणाच्या चौकशीसाठी तक्रार केली.तसेच येथील अधिकारी आणि कर्मचारी यांना फैलावर घेतले.याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करत शाळेतील मध्यान्ह भोजन कंत्राट विश्वासू संस्थांना द्यावे, अशी मागणी केली.

आमच्या भोजनात काच सापडणे आमच्यासाठी ही धक्कादायक आहे, हे कसे झाले याचा आम्ही ही शोध घेत आहोत.महापालिका प्रशासनही त्याची चौकशी करत आहे.आम्ही आता आणखी काळजी घेऊ, अशी प्रतिक्रिया श्रुती महिला बचत गट गृह उद्योगचे शैलेश तळेकर यांनी दिली.या प्रकरणी आता पुढे प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news