Cyber Fraud: डिजिटल अटकेची भीती दाखवून 1 कोटी उकळले

जर घराच्या बाहेर पडल्यास जीवाचे बरे वाईट होईल असे त्याना सांगितले.
 Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

मुंबई: डिजिटल अटकेची भीती दाखवून ठगाने वृद्धाकडून 1 कोटी रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. फसवणूक झालेले वृद्ध घाटकोपर येथे राहत असून ते सेवानिवृत्त आहेत. त्याचे तीन बँकेत खाती आहेत. 5 एप्रिलला ते घरी असताना त्याना एका नंबरवरून फोन आला.

फोनवर बोलणाऱ्याने तो मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. फेब्रुवारी महिन्यात तामिळनाडू येथे काही दहशतवाद्यावर अटकेची कारवाई केली आहे. त्याच्याकडे एक आधारकार्ड आढळून आले आहे. त्या आधारकार्डचा वापर करून सिमकार्ड खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केस दाखल झाली आहे. दोन तासात लखनऊ येथील मुख्यालयात हजर राहावे.

 Cyber Fraud
Construction Worker Death: मालाडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 20 व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

पोलीस तपास करून त्यानंतर क्लिअरन्स प्रमाणपत्र देतील अशा भूलथापा मारल्या. वृद्ध असल्याने त्याना लखनऊ येथे येणे शक्य नसल्याचे त्याना सांगण्यात आले. काही वेळाने त्याना एका नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. तो कॉल वृद्धाने उचलला. त्यानंतर पोलीस गणवेशातील ठगाने त्याना 80 लाख रुपयाचा गैर व्यवहार झाल्याचे भासवले.

ठगाने त्याना भीती दाखवून त्याना एका बंदिस्त रूम मध्ये बसण्यास सांगितले. त्या घटनेबाबत कोणालाही काही सांगू नये असे त्याना सांगण्यात आले. जर घराच्या बाहेर पडल्यास जीवाचे बरे वाईट होईल असे त्याना सांगितले.

 Cyber Fraud
Bhandup News: वऱ्हाडी पडले पाण्याच्या टाकीत; छेड काढणाऱ्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने दुर्घटना

या गुन्ह्याचा गुप्तपद्धतीने तपास करावा लागेल, त्यामुळे पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितले. जर या प्रकरणात निर्दोष सुटल्यास किलरन्स प्रमाणपत्र देतील असे त्याना सांगण्यात आले. ठगाने भीती दाखवून बँक खात्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर ठगाने त्याच्याकडून 1 कोटी 10 लाख रुपये उकळले. वृद्धाने भीती पोटी त्याच्या एफडी देखील मोडल्या. पैसे पाठवल्यानंतर त्याना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news