

मुंबई : अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सच्या किमतींमध्ये 388 कोटी रुपयांचा फेरफार केल्याच्या खटल्यातून अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष गौतम अदानी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश अदानी यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले.
बाजार नियमन उल्लंघनाचा आरोप असलेल्या आणि दीर्घकाळ चाललेल्या प्रकरणातून गौतम अदानी आणि राजेश अदानी यांना दोषमुक्त करण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला होता. तथापि, ठोस पुरावे नसल्याचे स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने हा खटला निकालात काढला.