

मुंबई : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर केलेल्या २९६ गणपती विशेष ट्रेन व्यतिरिक्त या ६ ट्रेन चालवण्यात येणार असून, यामुळे गणपती विशेष ट्रेनची एकूण संख्या आता ३०२ झाली आहे.
०१००३ साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवारी २५ ऑगस्ट, ०१ सप्टेंबर व ८ सप्टेंबर रोजी ८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. ०१००४ साप्ताहिक विशेष गाडी मडगाव येथून रविवारी २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबर रोजी १६.३० वा. सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ६ वा. लो. टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी..
गाडीची रचना : १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
आरक्षण: गणपती विशेष गाडी क्रमांक ०१००३ साठी आरक्षण ५ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू होईल. अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार आकारले जाईल.