

मुंबई : शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यंदा 51 वर्षे पूर्ण होत आहेत. बाप्पाच्या कृपेने आणि समाजाच्या सहकार्याने हा उत्सव दरवर्षी अधिकाधिक भव्य व यशस्वी होत आहे. शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता या नावाने हा उत्सव सर्वत्र ओळखला जातो.
उत्सव फक्त धार्मिकतेपुरता न राहता यातून सामाजिक प्रबोधन करणे हे आमचे ध्येय आहे. रक्तदान, नेत्रतपासणी, महिला सक्षमीकरण, शिक्षणविषयक उपक्रम, तसेच विविध आरोग्य आणि समाजोपयोगी कार्यक्रम हे नियमितपणे राबवले जातात. तसेच प्रत्येक वर्षी भटक्या विमुक्त जातीतील मुलांना शालेय साहित्य वाटप व गणेशोत्सवाच्या 11 दिवसांत टाटा व केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी मोफत न्याहारीचे वितरण केले जाते.
आजची धकाधकीची जीवनशैली आणि मोबाईलच्या अतिरेकामुळे मुलं व मोठ्यांवर मानसिक व शारीरिक परिणाम होत आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदा सजावटीत ङशषीं इीरळप ढहशीरिू या महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकला आहे.
ही थेरपी विचारशक्ती, भाषा, अनुशासन, क्रमबद्धता व सर्जनशीलता वाढवते. सजावटीतून विविध रंगसंगती, आकार, शब्दकोडी, पझल्स व दृश्यात्मक क्रियाकलापांद्वारे मेंदूच्या डाव्या भागाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. ही सजावट पर्यावरणपूरक असून दिव्यांगांसाठी रॅम्प आणि ब्रेल लिपीचाही वापर करण्यात आला आहे.
गेल्या अर्धशतकापासून आम्ही गणेशोत्सव भक्तिभाव, सामाजिक जबाबदारी आणि सर्जनशीलता यांच्या संगमातून साजरा करत आलो आहोत. यंदाही व्हा- Creative, व्हा - Ative या आगळ्या-वेगळ्या विषयाचा अनुभव घ्यायला नक्की या, असे आवाहन करण्यात आले आहे.