Gajanan Mehendale Memorial Award : राज्य सरकारकडून इतिहासकार गजानन मेहेंदळे स्मृती पुरस्काराची घोषणा

Gajanan Mehendale Memorial Award : राज्य सरकारकडून इतिहासकार गजानन मेहेंदळे स्मृती पुरस्काराची घोषणा
Published on
Updated on

मुंबई : मराठा इतिहास संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे प्रख्यात इतिहासकार दिवंगत गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य सरकारने पुरस्काराची घोषणा केली आहे. मराठेकालीन इतिहास संशोधन, लिखाणासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार असून एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

राज्याच्या सांस्कृतिक कार्यविभागाने ‌‘स्व. गजानन भास्कर मेहेंदळे स्मृती पुरस्कार‌’ देण्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मेहेंदळे यांनी मोडी, फारसी, उर्दू आणि पोर्तुगीज या भाषांमध्ये प्रावीण्य मिळवून ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ शिवचरित्र, मराठा युद्धनीतीचा इतिहास, युद्धशास्त्र आणि मध्ययुगीन भारतीय इतिहास या विषयांवर संशोधन व लेखन केले.

त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी मराठाकालीन इतिहास संशोधनात कार्यरत संशोधक, इतिहासकार, विद्वान आणि लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची स्थापन करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news