

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजिक केलेल्या विशेष फेरीचा आज शेवटचा दिवस असणार आहे. राज्यभरातून आतापर्यंत 13 लाख 25 हजार 486 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजूनही 8 लाख 44 हजार 171 जागा रिकाम्या राहिल्या आहेत.
यंदा अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकूण 9 हजार 548 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 14 लाख 85 हजार 686 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. उपलब्ध क्षमतेनुसार एकूण 18 लाख 23 हजार 960 इतक्या जागा होत्या. त्यापैकी कॅप राऊंडद्वारे 11 लाख 57 हजार 352 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अजूनही 6 लाख 66 हजार 608 जागा रिक्त आहेत.
तसेच कोटा आरक्षणातून 3 लाख 45 हजार 697 जागांपैकी 1 लाख 68 हजार 134 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे, तर 1 लाख 77 हजार 563 जागा अजूनही भरायच्या बाकी आहेत. एकूण सर्व मिळून 21 लाख 69 हजार 657 इतका प्रवेशक्षमतेचा आकडा होता. मात्र प्रत्यक्षात फक्त 13 लाख 25 हजार 486 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अजूनही 8 लाख 44 हजार 171 जागा रिकाम्या आहेत.
अकरावी प्रवेशाची आकडेवारी
महाविद्यालयांची संख्या 9,548
नोंदणी केलेले विद्यार्थी 14,85,686
ऑनलाइन कॅपफेरीतील जागा 18,23,960
कॅपमधून आतापर्यंत झालेले प्रवेश 11,57,352
कॅप मधील रहिलेल्या रिक्त जागा 6,66,608
कोट्यातील जागा 3,45,697
कोट्यातून झालेले प्रवेश 1,68,134
कोट्यातील रिक्त जागा 1,77,563
राज्यातील जागा 21,69,657
आतापर्यंत झालेले प्रवेश 13,25,486
रिकाम्या राहिलेल्या जागा 8,44,171