Former BMC Licence Inspector Arrest: मुंबई महापालिकेच्या माजी परवाना निरीक्षकाकडे सापडली ४५ लाखांची बेहिशेबी मालमत्ता; एसीबीकडून अटक

मुंबई एसीबीने माजी बीएमसी परवाना निरीक्षक विनाश शांतागम कांबळे यांना ४५.८१ लाखांच्या कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटक केली.
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम विभागातील परवाना विभागात कार्यरत तत्कालीन परवाना निरीक्षकाने ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी अटक केली.

विनाश शांतागम कांबळे असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे ४५ लाख ८१ हजार ४६० रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा आरोप आहे.

Arrested
Cyclone Kani: बंगालच्या उपसागरात ‘कानी’ चक्रीवादळाची शक्यता; राज्यातील तापमानात वाढ

कांबळे हे बृहन्मुंबई महापालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील के/पश्चिम विभागातील वरिष्ठ निरीक्षक, परवाना कार्यालयात तत्कालीन परवाना निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतर घेतलेल्या झडतीत काही बाबी समोर आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी सुरू केली होती.

या चौकशीदरम्यान १७ जुलै १९९६ ते २३ डिसेंबर २०१९ हा संपत्ती तपासणीचा कालावधी निश्चित करण्यात आला. या कालावधीत कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने तसेच कायदेशीर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचा दावा एसीबीने केला आहे.

Arrested
Redevelopment Permission: नवी मुंबईतील पुनर्विकासाची सूत्रे आता सिडकोच्या हाती? ५० हून अधिक सोसायट्यांच्या तक्रारी

त्यांच्या संपत्तीचे मूल्य ४५ लाख ८१ हजार ४६० रुपये असून, ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ही संपत्ती २७.६५ टक्के अधिक असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम १३(१)(ब) आणि १३(२) अन्वये गुन्हा क्रमांक ३७/२०२६ दाखल केला आहे. शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.