नवी मुंबई : गणेशोत्सवानिमित्त हार, गजरे आणि वेण्यांना मागणी वाढली आहे. त्यानुसार फुलांच्या दरातही वाढ झाली आहे. नवी मुंबइतील फुलविक्रेत्यांकडे मध्यम आकाराच्या हाराचे दर 50 ते 100 वरून 250 ते 300 रुपयांवर तर 20 रुपयांनी मिळणार्या गजरा 100 रुपयांवर गेला आहे. वेणीच्या दरातही वाढ झाली आहे.
दरवाढ झाली तरी खरेदीचा उत्साह कायम आहे. हार, फुले खरेदीसाठी भक्तांनी बाजारात गर्दी केली आहे. तसेच जास्वंद, दूर्वा, केवडा आणि शमीच्या पानांनाही मागणी आहे. दूर्वांची एक जुडी 10 ते 15 रुपयाला मिळत आहे.
अनेक गणेशभक्तांनी यंदा खर्या फुलांचे मखर बनविण्याला प्राधान्य दिल्याने मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होत असली तरीही फुलांचा दरवळ चांगलाच महागला आहे.
फुलांचे दर असे
कलकत्ता गोंडा - 100 रुपये
निशीगंध - 600 ते 700 रुपये
पिवळा गोंडा - 100 ते 150 रुपये
कलकत्ता गोंडा - 100 ते 150 रुपये
सोनचाफा - 800 ते 1000 रुपये
शेवंती - 500 ते 600 रुपये
अष्टर - 400 रुपये
मोगर्याचा गजरा - 100 रुपये
वेणी - 100 रुपये