

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पत्नी आणि अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ४४ वर्षीय नराधम बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतील एका भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बलात्काराच्या भादंवि कलमासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन गोवंडी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील पीडित मुलगी ही १३ वर्षांची असून नराधम बाप मे महिन्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत वाच्यता केल्यास त्याने पीडित मुलीला आणि पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. रोजचे अत्याचार सहन झाल्याने अखेर आरोपीच्या पत्नीने मुलीला सोबत घेऊन गोवंडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करुन मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.