Mumbai Crime : उपचाराच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करणार्‍या भोंदूबाबाला बेड्या

कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचे आमिष दाखवून केली जवळीक
Fake godman arrested assault woman
उपचाराच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करणार्‍या भोंदूबाबाला बेड्याFile Photo
Published on
Updated on

मुंबई : जादूटोण्याच्या माध्यमातून कौटुंबिक वाद संपुष्टात आणतो असे सांगून उपचाराच्या बहाण्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अब्दुर रशीद अब्दुल लतिफ शेख ऊर्फ बाबाजान या भोंदूबाबाला सांताक्रूज पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही महिलांशी गैरवर्तन केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

पीडित महिला सांताक्रूज येथे राहत असून तिचा तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. या वादाला ती कंटाळून गेली होती. याच दरम्यान तिची अब्दुर शेख या मांत्रिकाशी ओळख झाली. त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचे सांगून तिला उपचारासाठी खालापूर, महाड आणि नवी मुंबईतील त्याच्या घरी बोलाविले होते. तिथे अगरबत्तीचा वास देऊन तिला बेशुद्ध करून तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार नंतर तिच्या लक्षात आला.

गेल्या एक वर्षांपासून त्याच्याकडून उपचाराच्या नावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू होता. या उपचारातून तिच्या कौटुंबिक वादाबाबत काहीच समाधान झाले नव्हते. या घटनेनंतर तिने सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या भोंदूबाबाविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह लैंगिक अत्याचार आणि महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रस्था व जादूटोणा यांना प्रतिबंधक घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

कळंबोलीतून केली अटक

या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस निरीक्षक ज्योती हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तुषार सावंत, उपनिरीक्षक वृषाली चव्हाण, पोलीस अंमलदार अभिषेक कर्ले, मारुती गावडे, मनोज पाटील, प्रसाद यादव व स्वप्निल काकडे यांनी तपास सुरू केला.

मोबाईल लोकेशनवरुन या पथकाने कळंबोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल चौगुले, पोलीस हवालदार पवार, झोपडे यांच्या मदतीने अब्दुर शेख याला कळंबोलीतील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news