

Devendra Fadnavis on Prashant Kishor Defeat
मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक निकालात पाटी कोरी राहिलेल्या जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सल्ला दिला आहे. तसेच लोकशाहीमध्ये सर्वाधिक महत्त्व कशाचे असते हेही स्पष्ट केले आहे.
एका कार्यकम्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,. "लोकशाही चालवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग विचारांनी असतो. तर दुसरा मार्ग हा संख्याबळाचा असतो; परंतु संख्याबळाशिवाय तुम्ही विचारधारेचा प्रचार करू शकत नाही."
फडणवीस म्हणाले की, "प्रशांत किशोर यांनी विचारसरणीबद्दल चर्चा केली; पण त्यांना एकही जागा मिळाली नाही. राजकारणात तुम्हाला व्यावहारिक असावे लागते. उपयुक्तताआवश्यक आहे आणि त्यासाठी संख्याबळाची गरज आहे."
आमच्या विचारधारा जुळत नसल्या तरीही आम्ही किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवू शकतो, असे स्पष्ट करत फडणवीसांनी 1990 च्या दशकाकडे निर्देश केला, ते म्हणाले, "90 च्या दशकात पंतप्रधान रोज बदलत असत. तेव्हापासून आपण अधिक परिपक्व झालो आहोत," असे सांगत त्यांनी बदलत्या राजकारणात लवचिकतेवर जोर दिला.
पूर्वश्रमीचे निवडणूक रणनीतीकार असणार्या प्रशांत किशोर यांनी राजकारणात उडी घेतली. जन सुराज पक्ष स्थापन करत बिहारमधील सर्व जागांवर निवडणूक लढवली. त्यांनी तेजस्वी यादव आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीत सामील होण्यासही नकार दिला. तसेच माझ्या पक्षाला १३४ पेक्षा कमी जागा मिळाल्या तर मी माझाला मात्र त्यांच्या पक्षाची पाटी कोरीच राहिली.