मुंबई : मुंबईत आय फ्लू या डोळ्यांच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. लालसरपणा, जळजळ, पाणी किंवा चिकट स्त्राव, प्रकाश सहन न होणे यासारखी लक्षणे लक्षणे असून मुंबईकरांनी डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला तज्झ डॉक्टरांनी दिला आहे.
उन्हाळ्यानंतर वाढणारी आर्द्रता आणि ओलावा सुक्ष्मजंतूंच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने सध्या डोळ्यांच्या संसर्गाचे (आय फ्लूचे) प्रमाण वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक, कार्यालयीन कामे आणि शाळा सुरू असल्याने संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोणत्याही सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित खबरदारी घेणे आवश्यक आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. निशा चौहान म्हणाल्या की, लहान मुले, श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेले लोक, कॉन्टॅक्ट लेन्स घालणारे आणि संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात येणारे लोक विशेषतः जास्त धोका पत्करतात. त्यामुळे त्यांना अतिरिक्त दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शशी कपूर यांनी सांगितले की, डोळ्यांना आराम देण्यासाठी लोक सहसा गुलाबपाणी, मध किंवा तूप यांसारखे पारंपारिक उपाय वापरतात. परंतु हे संसर्ग थांबवतीलच असे नाही. उलट, अनेक वेळा हे पदार्थ सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल ठरू शकतात. म्हणूनच, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेले घरगुती उपाय संसर्ग आणखी गंभीर बनवू शकतात.
स्वच्छता राखा
स्पर्श करण्यापूर्वी हात धुणे,
इतरांसोबत तुमचे वैयक्तिक सामान शेअर नका
बाहेरून परतल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे