Funnel Zone FSI : 'फनेल झोन'साठी बिल्‍डरांना जादा एफएसआय

पुनर्विकास टप्प्यात: महापालिकेसह विविध यंत्रणांना पडताळणीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Funnel Zone FSI
'फनेल झोन'साठी बिल्‍डरांना जादा एफएसआयpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावली३३(७) प्रमाणे बिल्‍डरांना सवलती, वाढीव एफएसआय दिला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेसह विविध यंत्रणांना पडताळणी करण्‍याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. त्‍यामुळे येथील पुनर्विकासाला गती मिळणार असून यामुळे २० लाख मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री यांनी गुरुवारी विविध यंत्रणांची बैठक घेतली. याबैठकीस मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित साटम, पराग अळवणी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Funnel Zone FSI
Maharashtra Narmada water | वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, अखेर नर्मदेतून महाराष्ट्राला मिळणार १० टीएमसी पाणी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, फनेल क्षेत्रातील निर्बंध बाधित इमारतींच्या संदर्भात एफएसआयचे 'पोटेन्शिअल' कुठे द्यायचा आहे, याबाबत महापालिकेने निर्णय घ्यावा. देण्यात येणारा एफएसआय कुठे वापरायचा आहे, हे ठरवावे. रस्ता रुंदीकरणाप्रमाणे उच्च एफएसआय लगतच्या किंवा जवळील बांधकामात एकत्र करता येईल का, याची पडताळणी करावी.

बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी रस्त्याच्या रुंदीनुसार उच्चस्तरीय एफएसआय द्यावा. मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा, सिडको अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून गृहनिर्माणाचे काम चालते. या संपूर्ण यंत्रणांचे नियमन व नियंत्रण नगर विकास विभागाने करावे.

Funnel Zone FSI
Mumbai Water Metro project: जलवाहतुकीचा नवा अध्याय! मुंबई धावणार वॉटर मेट्रो; नॉर्वेतील कंपनीशी करार

फनेल झोन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेने 'मॅपिंग' करावे. जुहू येथील मिलिटरी ट्रान्समिशन निर्बंध असलेल्या इमारतींची पुनर्विकास कार्यवाही गतीने पूर्ण करावी. बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी उच्च एफएसआय देऊन बांधकामाच्या एकत्रीकरणाला मान्यता द्यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

२० लाख मुंबईकरांना दिलासा

मुंबईतील घाटकोपर, कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी, विलेपार्ले येथील अंदाजे १५ ते २० लाख लोक या फनेल झोनमधील इमारतींमध्ये राहात आहेत. त्यातील अनेक इमारती या ६० ते ७० वर्षे जुन्या झाल्याने अत्यंत धोकादायक आणि मोडकळीस आल्या आहेत. त्यात अनेक नागरिक आपला जीव मुठीत धरून राहात आहेत.

फनेल म्हणजे काय?

धावपट्टीच्या शेवटच्या टोकापासून हे फनेल सुरू होते आणि धावपट्टीच्या टोकापासून ३०० मीटरपर्यंत कोणत्याही बांधकामास बंदी असते. त्यानंतर पुढे दर १०० मीटरला २ मीटर याप्रमाणे बांधकामाची परवानगी दिली जाते.

समस्‍या काय?

पुनर्विकास करताना सध्याच्या नियमावलीनुसार संपूर्ण मुंबईसाठी लागू असलेला २.५ एफएसआय मिळतो. पण इतका एफएसआय विमानतळाच्या फनेल झोनमधील इमारतींचा पुनर्विकास करताना उंचीच्या निर्बंधामुळे पूर्ण वापरता येत नाही. या इमारतींचा पुनर्विकास करणे व्यवहारिक नसल्याचे कारण पुढे करून अनेक विकासकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news