भाजपमधून 40 बंडखोरांची हकालपट्टी

Maharashtra Assembly Election : पक्षाचा आदेश डावलल्याने कारवाई
Maharashtra Assembly Elections 2024
भाजपमधून 40 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आलीPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : पक्षाचा आदेश डावलत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याबद्दल भाजपने आपल्या बंडखोर पदाधिकार्‍यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. भाजपमधून 40 जणांना निलंबित करण्यात आल्याचे पत्रक मंगळवारी रात्री उशिरा पक्षाकडून जारी करण्यात आले. मात्र, त्याचवेळी दोनवेळा खासदार राहिलेल्या हीना गावितांप्रमाणे काहींनी स्वतःच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने कारवाईचा मुद्दाच निकाली निघाला. दुसरीकडे, माजी खासदार ए. टी. नाना पाटील आणि नाना अंबोलेंबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. भाजपने 37 विधानसभा मतदारसंघांतील 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. दुसरीकडे, महायुतीत अजूनही किमान 70 जागांवर छोट्या -मोठ्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे.

दरम्यान, जळगावमधील भाजपचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी एरंडोल मतदारसंघात बंडखोरी केली आहे. पाचोरा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या दोघांची बंडखोरी कायम असतानाही भाजपने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. ए. टी. नाना आणि अमोल शिंदे या भाजपच्या बंडखोरांनी शिवसेना उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केले आहे. शिवडी मतदारसंघात मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्याविरोधात महायुतीने उमेदवार दिलेला नाही. तेथे भाजपने नांदगावकरांना पाठिंबा दिला आहे. मात्र, तेथे बंडखोरी केलेल्या नाना अंबोले यांच्यावरही कारवाई झालेली नाही.

कारवाई झालेले नेते

धुळे - श्रीकांत कर्ले, सोपान पाटील, जळगाव - मयूर कापसे, अश्विन सोनवणे, अकोट - गजानन महाले, वाशिम - नागेश घोपे.

बडनेरा - तुषार भारतीय, अमरावती - जगदीश गुप्ता, अचलपूर - प्रमोद सिंह गडरेल, साकोली - सोमदत्त करंजेकर, आमगाव - शंकर मडावी, चंद्रपूर - ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपुरी - वंसत वरजूकर.

वरोरा - राजू गायकवाड, एतेशाम अली, उमरखेड - भाविक भगत, नटवरलाल अंतवल, नांदेड उत्तर - वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख.

नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे, घनसावंगी - सतीश घाटगे, जालना - अशोक पांगारकर, गंगापूर - सुरेश सोनवणे.

वैजापूर - एकनाथ जाधव, मालेगाव - कुणाल सूर्यवंशी, बागलान - आकाश साळुंखे, जयश्री गरुड, नालासोपारा - हरिश भगत.

भिवंडी - स्नेहा पाटील, कल्याण - वरुण पाटील, मागाठाणे - गोपाळ जव्हेरी, जोगेश्वरी - धर्मेंद्र ठाकूर, अलिबाग - दिलीप भोईर, नेवासा - बाळासाहेब मरकुटे, सोलापूर शहर उत्तर - शोभा बनशेट्टी, अक्कलकोट - सुनील बंडकर, श्रीगोंदा - सुवर्णा पाचपुते आणि सावंतवाडी - विशाल परब.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news