Government anti Naxal operation | 794 शरण आले त्याची गोष्ट; नक्षलवादाकडून विकासाकडे

Anti-Naxal Operations Maharashtra
गडचिरोली येथे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेPudhari File Photo
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : भारतातून नक्षलवादाचे उच्चाटन 31 मार्चच्या आत होईल ही भारत सरकारची घोषणा दोन पॉलिट ब्यूरो सदस्य वगळता सर्व बडे नक्षलवादी शरण आल्याने प्रत्यक्षात येते आहे.

एकेकाळी क्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी रक्ताची आस लागलेले, जग लाल करण्यासाठी जीवावर उदार होऊन रानोमाळ भटकणारे नक्षलवादी आता शांत आयुष्य जगत आहेत. महाराष्ट्राने 2005 पासून सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेत 794 जहाल नक्षलवादी हिंसेची साथ सोडून विकासाची कास धरत आहेत.

नवजीवन कॉलनी

गडचिरोलीत पोलिसांना शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे पुनर्वसन उत्तमरीतीने सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा विपरीत अनुभव अजूनपर्यंत आलेला नाही, असे सांगतात. गडचिरोलीत नवजीवन कॉलनी नावाने उभारण्यात आलेल्या एका सुंदर वसाहतीत यातील 102 माजी नक्षलवादी शांततापूर्ण जीवन जगत आहेत.

मुंबईत अर्ध वार्षिक पोलिस बैठकीसाठी आलेले गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले, शरण आलेल्या भूपती या नक्षलनेत्यासह ही सर्व मंडळी आजपर्यंत उत्तम सहकार्य करत आहेत. नवीन काही करण्यावर त्यांचा भर आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभ

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत रमाई, पंतप्रधान आवास, दुग्धविकास योजना, असे लाभ दिले जात आहेत. महाराष्ट्राने पूर्वीपासूनच दल सदस्य असलेले नेते समोर आले तरच शरणागतांमध्ये समावेश करायचा, असे ठरवले आहे. तरीही 794 नक्षलवादी आता बदलले आहेत.

154 जणांना भूखंड वाटप, तर 73 जणांना स्टील उद्योगात संधी

ठिकठिकाणचे गावकरी काही राज्यांमध्ये शरणार्थी दाखवले जात असले, तरी महाराष्ट्राने याबाबत नियमात कोणतीही शिथिलता येऊ दिलेली नाही. नक्षलवाद सोडून विकासगंगेत सामील होण्यासाठी पुढे आलेल्या या पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना 154 भूखंड देण्यात आले आहेत. त्यावर ते शेती करत आहेत. 73 माजी नक्षलवादी आता लॉईडस् मेटल या उद्योग समूहामध्ये काम करत आहेत. 73 माजी नक्षलवाद्यांना सरकारी ओळखपत्रे मिळाली आहेत.

नक्षलवादी महिला उद्योगिनी

आत्मसमर्पित नक्षलवादी मंडळींच्या हालचाली आजही सरकारच्या देखरेखीखाली असतात. माजी नक्षलवादी महिला आता उद्योगिनी झाल्या आहेत. जंगल उत्पादनावर प्रक्रिया करून या महिला त्या विक्रीला ठेवतात. संदीप पाटील नागपूर परीक्षेत्र पोलिसप्रमुख यांनी या संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवले असून, शहरी नक्षलवाद वाढू नये यासाठी चोख देखरेख ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news