MBA engineering admission : आजपासून एमबीएसह अभियांत्रिकी पदवी प्रवेश

नोंदणीसाठी 8 जुलैपर्यंत मुदत; नोंदणी वेळापत्रक जाहीर
MBA engineering admission
आजपासून एमबीएसह अभियांत्रिकी पदवी प्रवेश pudhari photo
Published on
Updated on

मुंबई ः राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून बी.ई./बी.टेक. (चार वर्षे) आणि पाच वर्षांच्या मास्टर्स अभ्यासक्रमासाठी तसेच एमबीए प्रवेश नोंदणी प्रक्रिया आजपासून (शनिवार) सुरू करण्यात आली आहे. प्रवेश नोंदणी 8 जुलैपर्यंत करता येणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी 12 जुलै रोजी प्रसिद्ध होईल, तर हरकती विचारात घेत अंतिम गुणवत्ता यादी 17 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

यंदा एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 16 आणि 17 जून रोजी जाहीर झाल्यानंतर दहा दिवसांनी ही प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी यंदा कागदपत्रे पडताळणीसाठी दोन पर्याय आहेत असणार आहेत. ई-स्क्रुटिनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटिनी. ई-स्क्रुटिनीसाठी अर्जदाराने ऑनलाइन फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. ही पडताळणी स्क्रुटिनी केंद्राकडून ऑनलाइनच केली जाईल.

प्रत्यक्ष स्क्रुटिनीसाठी, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या सुविधा केंद्रावर उपस्थित राहून अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. या प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित या अनिवार्य विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि वैकल्पिक विषयांसह किमान 45 टक्के गुण (मागासवर्गीयांसाठी 40 टक्के) मिळवलेले असणे आवश्यक आहे. तसेच, एमएचटी-सीईटी किंवा जेईई मेन परीक्षांमध्ये वैध गुण मिळवणे आवश्यक आहे. सीईटीसाठी पूर्वीच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नाही. इतर विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 1 हजार, तर आरक्षण प्रवर्ग/दिव्यांग/ट्रान्सजेंडर प्रवर्गासाठी 800 शुल्क आकारले जाणार आहे.

वाढती मागणी

गेल्या वर्षी 1,49,078 विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेश घेतला होता. यंदाही सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज या अभ्यासक्रमांना मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे.

एमबीए आणि अभियांत्रिकी प्रवेश वेळापत्रक

  • विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी : 28 जून ते 8 जुलै

  • कागदपत्रांची पडताळणी : 30 जून ते 9 जुलै

  • प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी : 12 जुलै

  • यादीवर हरकती व तक्रार : 13 ते 15 जुलै (सायंकाळी 5 पर्यंत)

  • अंतिम गुणवत्ता यादी : 17 जुलै

  • पसंतीक्रम आणि गुणवत्ता फेरींचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार

एमबीए प्रवेशही आजपासून

एमबीए प्रवेशाची नोंदणीही शनिवारपासून सुरु होत असून 8 जुलैपर्यंत सुरू असणार आहे. 30 जून ते 9 जुलै या काळात कागदपत्रांची आणि अर्जांची पडताळणीही होणार आहे. त्यानंतर 12 जुलै रोजी दोन्ही अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी 12 जुलै रोजी जाहीर होईल. त्यानंतर या गुणवत्ता यादीवर हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी 13 ते 15 जुलैची मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी 17 जुलै रोजी जाहीर होणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांची पसंती भरण्यासाठी वेळ दिला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news