यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने शहरी भागातील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ८५ वर्षांवरील ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांसाठी घरपोच मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत 66 अद्यापही ज्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदविले नाही, ते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. ही प्रक्रिया आयोगामार्फत निरंतर सुरू आहे. ज्येष्ठ मतदार हे मतदान कक्षावर येऊन मतदान करण्यासाठी उत्सुक असतात, हे लोकसभेच्या मतदानाच्या वेळी प्रकर्षान दिसून आले, ही बाब युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
- राजीव कुमार, केंद्रीय निवडणूक आयुक्त
कातकरी, कोलम, मारिया गोंड या आदिवासी मतदारांची १०० टक्के नोंदणी.
प्रत्येक मतदान केंद्रावर मदत केंद्र, दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी.
अतिदुर्गम भागात प्रत्येकाच्या घरी जाऊन निवडणूक आयोगाकडून
सर्वेक्षण.
रोजंदारी कामगारांना मतदानासाठी भरपगारी रजा देण्याच्या सूचना.
निवडणुकीच्या मैदानात उतरणार ११ राजकीय पक्ष.
मद्य, अमली पदार्थांचे वाटप यासारख्या गैरप्रकारांवर कडक निर्बंध घालणार.