Vidhan Parishad by-election
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ ला मतदान file photo

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ ला मतदान

Vidhan Parishad by-election | १० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात
Published on

मुंबई : विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

रिक्त जागांवर भाजपचे ३, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रत्येकी एक अशा पाच आमदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तसेच, २७मार्चला मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने विधान परिषद सदस्यांना उतरवले होते. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी (अक्कलकुवा), अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (पाथरी) आणि भाजपचे प्रवीण दटके (नागपूर मध्य), गोपीचंद पडळकर (जत) आणि रमेश कराड (लातूर ग्रामीण) यांचा समावेश होता. हे सर्व आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ मार्च असून, १८ मार्चला छाननी होईल. माघारीची मुदत २० मार्च असून, २७ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल व संध्याकाळी निकाल जाहीर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news