Baramati Bye-Election | बारामती व राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, निवडणूक आयोगाकडून घोषणा!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची घोषणा, 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया 4 मे रोजी निकाल, पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू, आसाम राज्यातील निवडणूकीचा बिगूल वाजला.
Election Comission | बारामती व राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, निवडणूक आयोगाकडून घोषणा!
Election Comission | बारामती व राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, निवडणूक आयोगाकडून घोषणा!
Published on
Updated on

नवी दिल्लीः भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सांयकाळी पत्रकार परिषद घेऊन पश्चीम बंगाल, आसाम या तामिळनाडू व केरळ या राज्यांतील निवडणूकीची घोषणा आज त्‍यांनी केली. याबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटका, नागालँड, त्रिपूरा, या राज्यांतील पोटनिवडणूकांची देखील घोषणा करण्यात आली.

यापैकी गोवा, कर्नाटक, नागलँड, व त्रिपूरा या राज्यातील पोटनिवडणूकीसाठी 9 एप्रिलला मदतान होईल तर महाराष्ट्र व गुजरातमधील पोटनिवडणूकीसाठी 23 एप्रिलला मतदान हाईल

Election Comission | बारामती व राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, निवडणूक आयोगाकडून घोषणा!
Assembly Elections 2026 |पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! प. बंगालमध्‍ये दोन टप्‍प्‍यात मतदान

अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक

महाराष्ट्रातील बारामती व राहुरी या दोन मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे तत्‍कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार याचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. त्‍यामुळे त्‍यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभेची जागा रिक्त आहे. तसचे नगर मधील राहूरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कार्डिले यांचे निधन झाल्याने तिही जागा रिक्त आहे. या दोन जागांवरील पोटनिवडणूकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होईल व 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

शिवाजी राव कार्डीले यांच्या निधनाने राहूरीची जाग रिक्त

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ६ वेळा आमदार राहिलेले दिग्गज नेते शिवाजीराव कार्डिले (वय ६७) यांचे ऑक्टोबर २०२५ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते. यामुळे ही जाग रिक्त झाली होती आता या जागेसाठी पोट- निवडणूक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news