Politicians Ganpati darshan : निवडणुकीसाठी इच्छुकांची घरगुती बाप्पांच्या दर्शनाला हजेरी

सार्व.गणेशोत्सवातही सहभाग
Ganeshotsav 2025
निवडणुकीसाठी इच्छुकांची घरगुती बाप्पांच्या दर्शनाला हजेरीfile photo
Published on
Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकासाठी महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून सुचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारही कुठल्या पॅनलमधून निवडणूक लढवावी याची मोर्चेबांधणी करत आहेत.आता प्रभागातील ज्या रहिवाशांच्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तेथील घरांमध्ये दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. इच्छूक उमेदवारांबरोबरच आमदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सर्वच ठिकाणी हजेरी लावत आहेत.

महापालिकेची निवडणूक तब्बल साडेपाच वर्षे पुढे ढकलल्याने इच्छूक उमेदवार हतबल झाले होते. पण आता प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे इच्छूक उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार झाले आहेत. आता हे उमेदवार मतदारांशी नाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकासाठी इच्छुक उमेदवारांनी कोरोनाच्या काळखंडात प्रभागातील नागरिकांना मदतीचा हात दिला होता. त्यावेळी मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या आदींचे वाटप केले होते. त्यानंतर हळदी-कुंकू, गुणगौरव, विद्यार्थी सत्कार, छत्र्या वाटप आदी कार्यक्रम घेऊन प्रभागातील मतदारांचा संपर्क तुटू नये यासाठी प्रयत्न केला होता.

नवी मुंबई महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणार होत्या. मात्र कोरोनासारख्या साथीच्या आजारामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. मे 2020 मध्ये महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कालखंड बरखास्त होऊन महापालिकेवर आयुक्तांची प्रशासक म्हणून निवड झाली. राज्यात घडलेल्या सत्तांतरामुळे महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्या.लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. साडेपाच वर्षांपासून प्रभागात करत असलेल्या कामांमुळे आता स्पर्धेत राहण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सव काळात इच्छूकांकडून प्रभागातील मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गणेशोत्सवाचा फायदा घेत घरगुती बाप्पाची प्रतिष्ठापना करणार्‍या गणेश भक्तांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेत मतदारांशी संवाद वाढवत आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळांनाही हात सैल सोडत देणगी देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी आरतीची पुस्तके छापून प्रभागातील बाप्पाची प्रतिष्ठापना करणार्‍यांच्या घरी वाटण्यात येत आहेत. या पुस्तकांवर स्वत:च्या फोटोसह पक्षांचा प्रचारही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news