

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यंमत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना माझ्या नाराजीच्या फक्त चर्चा सुरू आहेत, असे स्पष्ट करत शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे, असे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान संध्याकाळी उशिरा वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार , धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांच्यासह आमदार रविंद्र चव्हाण व माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.