Shivsena | बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना शिव्या घालता आणि काँग्रेसच्या ओव्या गाता! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, काळजाचा तुकडा, शिवसेनेचा वर्धापनदिन
Shivsena
शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

मुंबई: ‘शिवसेना म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर तो आपल्या काळजाचा तुकडा आणि भगवं वादळ आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणाऱ्यांना तुम्ही शिव्या घालता, पण काँग्रेसच्या ओव्या गाता अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला’ पुढे ते म्हणाले की आम्ही चार वर्षांपूर्वी जो ऐतिहासिक उठाव केला, तो आज 'सुपर हिट' ठरला आहे, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथ शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत.

पुढे शिंदे यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा कुणीही सोबत येणार नाही, कुणीही निवडून येणार नाही, अशा वल्गना केल्या गेल्या होत्या. मात्र, ४० आमदारांवरून आम्ही आज ६० आमदार निवडून आणून दाखवले आहेत. आज सर्वत्र पक्षाचे नगरसेवक, सभापती असून सगळीकडे शिवसेनेचे वादळ फडकत आहे." असेही सांगितले

त्‍यांचा पाय ब्रेकवर आमचा पाय ॲक्सिलेटरवर

ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्‍यावेळी त्‍यांचा पाय नेहमी ब्रेकवर असायचा. आम्ही आता महायुतीम्हणून महाराष्ट्राच्या विकास वेगाने करत आहोत. आमचा पाय ॲस्किलेटरवर राहणार आहे. राज्याचा विकास वेगाने पुढे जात राहिल. त्‍यांनी लावलेल्या अनेक कामांचा ब्रेक आम्ही काढला असेही त्‍यांनी सांगितले.

एक शाखा प्रमुख मुख्यमंत्री झाला

पुढे त्‍यांनी म्हटले की माझ्या आयुष्यात डोंगरा एवढी दुःख होऊन गेली, मी डगमगलो नाही राज्यातील तमाम जनता हेच माझे कुटुंब आहे, माझ्यामागे कुणी गॉड फादर नव्हता पण माझ्या शिवसैनिकांच्या पाठबळावर येथपर्यंत पोहचलो आहे. कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यत नेण्याची ताकद फक्त शिवसेनेनत आहे असेही त्‍यांनी ठामपणे सांगितले. ही शिवसेना आहे शिवसैनिक हाच खरा आमच्या पाठीचा कणा आहे. बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिक हे मोठे पद आहे, पक्ष म्हणजे शिवसैनिक आहे आणि त्‍यांचा जीवावर आपण मोठे होतो. माझ्यासारखा शाखाप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो हीच शिवसैनिकांची ताकद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news