.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेससोबत माझे कधी पटले नाही. आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर येताच आपल्याला उलटी येते, असे वक्तव्य करणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावले असल्याचे समजते.
डॉ. सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मंत्री आणि पदाधिकारीही नाराज आहेत. सत्तेत एकत्र असतानाही आमच्या पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विरोधात जाहीर बोलण्याचे धाडस कोणाच्या तरी सांगण्यावरून झाले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्तेतील एका घटक पक्षाच्या नेत्यावर अशा प्रकारे टीका करणे योग्य नाही. अन्यथा आम्हालाही अशा प्रकारची कडवट भूमिका घ्यावी लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली असल्याचे समजते. सावंत यांच्या पाठोपाठ भाजपचे नेते गणेश हाके यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर घुमू लागला आहे.