Edward Theater - Kalbadevi | १०५ वर्षांचा इतिहास असलेले 'एडवर्ड' ही झाले बंद !

ब्रिटिशकालीन चित्रपटगृहात कोरोनानंतर शिट्याच ऐकू आल्या नाहीत
Edward Theater - Kalbadevi
काळबादेवी येथील एडवर्ड थिएटर Admin
Published on
Updated on
राजेश सावंत

मुंबई : इंग्रजी व हिंदी चित्रपटांनी नेहमी गजबजून जाणारे व सुमारे १०५ वर्षाचा इतिहास असलेले काळबादेवी येथील ब्रिटिशकालीन एडवर्ड थिएटर अखेर बंद झाले. तब्बल १०० वर्षापेक्षा जास्त काळ तग धरून राहिलेल्या या थिएटरमध्ये कोरोना महामारीनंतर प्रेक्षकांच्या शिट्या कधी ऐकू आल्याच नाहीत.

मुंबई शहर व उपनगरात सिंगल स्क्रीनची काही चित्रपटगृहे उरली आहेत. यात ब्रिटिशकालीन एडवर्ड थिएटरचा समावेश आहे. डबल बाल्कनी असलेल्या या चित्रपटगृहाला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून घेतले होते. गिरगाव, चिरा बाजार, चंदनवाडी, काठचादेवी या मराठी लोकवस्तीमध्ये असलेल्या या चित्रपटगृहाचा प्रवास थक करणाराच आहे. साधारणतः १९२० मध्ये हे चित्रपटगृह प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाले. २०२२ पर्यंत म्हणजेच कोरोना महामारीपर्यंत मा चित्रपटगृहामध्ये हिंदी, इंग्रजी चित्रपट झळकत होते. विशेष म्हणजे पूर्वी इतकी गर्दी राहिली नसली तरी प्रेक्षक आवर्जून या चित्रपटगृहातील बाल्कनीमधून चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून येत होते. पण प्रेक्षक नसल्यामुळे बाल्कनीही बंद झाल्या. हे चित्रपटगृह फक्त स्टॉलपुरते मर्यादित राहिले, कालांतराने प्रेक्षकांपेक्षा रिकामी खुर्च्याच चित्रपट बघू लागल्या.

कोरोना महामारीनंतर एडवर्ड थिएटर पुन्हा नव्या दमाने प्रेक्षकांच्या सेवेत उतरेल असे वाटत होते. पण या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट झळकलाच नाही. आता या चित्रपटगृहाला उतरती कळा लागली असून हे चित्रपटगृह येणाऱ्या काळात इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही. मुळात मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमुळे सिंगल स्क्रीनचे चित्रपटगृह टप्प्याटप्प्याने बंद होत गेले. याला एडवर्डही अपवाद नाही, मुंबईत महाराष्ट्राचा गौरवस्थान मिनर्वा, नोवेल्टीसारखी सिंगल स्क्रीनची अनेक चित्रपटगृहे होती. पण ही सर्व चित्रपटगृहे इतिहासजमा झाली आहेत. दक्षिण मुंबईत विशेषतः गिरगावमध्ये राहणाऱ्या नागरिकांना एडवर्डमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे.

एडवर्डचा मूळ मालक फाळणीनंतर पाकिस्तानात

• एडवर्डचा मूळ मालक फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्याने विजन भरुचा आणि त्यांची जर्मन पत्नी पांनी या थिएटरची व्यवस्था पाहिली, त्यांच्यानंतर पूनावाला नावाची व्यक्ती विएटर सांभाळायला लागली. अगदी सुरुवातीला येथे विदेशी लघुपट, मग इंग्रजी सिनेमेही रीलिज होत असत, हिंदी सिनेमांची निर्मिती वाढल्याने त्यांना सातत्याने स्कोप मिळाला. अनेक वर्षे रविवारी सकाळी इंग्रजी सिनेमा प्रदर्शित होत, ज्या इंग्रजी सिनेमांना रिगल, इरॉस, न्यू एम्पावरला स्थान नसे ते स्थान एडवर्डमध्ये मिळत असे.

सत्तरच्या दशकात १ रुपया ५ पैसे तिकीट

• सत्तरच्या दशकात एडवर्डला तिकीट १ रुपया ५ पैसे होते, मग १ रुपया ६५ पैसे झाले. कालांतराने तिकीट दरात वाढ होत गेली. मात्र सिंगल स्क्रीन सिनेमागृहाकडे येणाच्या प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

'संतोषी माँ' चित्रपटाचा ५० आठवड्यांचा मुक्काम

• एडवर्डच्या इतिहासात एक लक्षात राहणारी गोष्ट पडली, सतराम रोहरा निर्मित बहुचर्चित 'जय संतोषी माँ' या पौराणिक चित्रपटाने येथे तब्बल ५० आठवड्यांचा मुक्काम केला. प्रत्येक शुक्रवारी जम संतोषी माँ' चित्रपटाचे सर्वच शो हातस्फुल्ल असायचे. येथे येणारा प्रेक्षक हा देवीचा भक्त म्हणूनच येत होता. अनेकजण येताना हार बेऊन येत होते, तर काही प्रेक्षक चक चित्रपटगृहाबाहेर चप्पल काढून आत येत होते. एडबर्डमध्ये जास्त व्यठबडे मुकाम केलेला हा एकमेव सिनेमा होता, असे सांगण्यात येत आहे.

महिलांना वरच्या बाल्कनीत प्रवेश नाही

• एडवईला लाकडी खुर्चा हे आणि एक वैशिष्टय होते. एडवर्डमध्ये स्टॉल व दोन बाल्कनीला ड्रेस सर्कल व फर्स्ट क्लास असा उल्लेख केला जात असे. या थिएटरच्या धोरणानुसार अगदी वरच्या बाल्कनीची तिकिटे महिला प्रेक्षकांना दिली जात नव्हती. जिने चढताना अथवा उतरताना साडी अथवा दुप्पट्टा नेसलेल्या महिलांना त्रास होऊ नये, हेच यामागचे कारण होते. थिएटर बंद होईपर्यंत महिलांना कधीच वरच्या बाल्कनीमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news