Dry Fruit Price Hike: बदाम, पिस्ता, खजूर महागले; नवी मुंबईत सुका मेव्याच्या दरात मोठी वाढ

पिस्ता १८०० रुपये किलोवर; खजूर आणि बदामही महागले
Dry Fruits Price Hike
Dry Fruits Price HikePudhari
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: हिवाळ्याची चाहूल लागताच नवी मुंबईतील बाजारपेठेत सुका मेव्याला मागणी वाढू लागली आहे. थंडीच्या दिवसांत आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याकडे नागरिकांचा कल असतो.

त्यामुळे बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, खजूर, अंजीर आणि मनुका यांसारख्या सुका मेव्याच्या खरेदीला पसंती दिली जात आहे. मात्र यंदा सुका मेव्याच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

Dry Fruits Price Hike
Revas Karanja Sea Bridge: रेवस-करंजा पुलामुळे मुंबई-अलिबागचा प्रवास ४५ मिनिटांत! केबल स्टेड गर्डर तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाची उभारणी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रकारच्या सुका मेव्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या वर्षी प्रतिकिलो सुमारे ८०० रुपये असलेले बदाम यंदा ११०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पिस्त्याचे दर ९०० रुपयांवरून १८०० रुपयांपर्यंत गेले आहेत. खजुराचे दरही २५० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

काजूचे दर गेल्या वर्षी ८५० ते १००० रुपये प्रतिकिलो होते, ते यंदा ९०० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत. अक्रोडचे दर मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच साधारण ११०० ते १४०० रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत.

Dry Fruits Price Hike
Mumbai Manhole Cover Theft: मॅनहोल झाकणांची चोरी सुरूच; चोरलेली झाकणे बदलण्यासाठी पालिकेला ९० लाखांचा भुर्दंड

थंडीच्या दिवसांत सकाळच्या नाश्त्यासोबत दूध, लाडू तसेच विविध खाद्यपदार्थांमध्ये सुका मेव्याचा वापर वाढतो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण आपल्या आहारात बदाम, अक्रोड, खजूर आणि मनुका यांचा समावेश करतात. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारपेठेत सुका मेव्याच्या खरेदीला चालना मिळत आहे.

दरवाढीमुळे ग्राहकांकडून किलोभर खरेदी करण्यापूर्वी २५० ते ५०० ग्रॅम प्रमाणात सुका मेवा खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयात खर्च आणि वाहतूक खर्च यांचाही सुका मेव्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.

आगामी काळात थंडीचा जोर वाढल्यास मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र वाढलेल्या किमतींमुळे यंदाच्या हिवाळ्यात सुका मेवा खरेदी करताना ग्राहकांना आर्थिक गणित जुळवावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.