Dr Sampada Munde Case | विशाखा समितीचा अहवाल सादर करा

डॉ. नीलम गोर्‍हे; डॉ. संपदा मुंडे प्रकरणात चार्जशीट वेळेत दाखल करण्याच्याही सूचना
Dr Sampada Munde Case
मुंबई : येथील बैठकीत अधिकार्‍यांना सूचना करताना डॉ. नीलम गोर्‍हे, डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. नितीन अंबाडेकर आदी.(Pudhari Photo)
Published on
Updated on

सातारा/ मुंबई : फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणातील चार्जशीट वेळेत दाखल करावी, अशा सूचनाही आढावा बैठकीत त्यांनी दिल्या.

फलटण प्रकरणातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला आयुक्त आरोग्य सेवा डॉ. कादंबरी बलकवडे, आयुक्त सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते. दूरद़ृश्य प्रणालीद्वारे सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, सातारा जिल्हा चिकित्सक डॉ. युवराज करपे, फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ, पुणे विभाग आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. पवार, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या व अन्य महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

Dr Sampada Munde Case
Satara News: डांबरीकरणाच्या कामामुळे सातारा-लोणंद रस्ता जाम

विशाखा समिती अहवाल सादर करा

फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी होत्या. रुग्णालयातील सर्व सहकार्‍यांशी त्यांचे संबंध चांगले होते. कोणतीही तक्रार त्यांच्याविरुद्ध नव्हती. पोस्टमार्टम विभागात त्यांच्यासोबत दोन महिला डॉक्टर कार्यरत असून कामकाजात कोणताही दबाव नसल्याचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. रुग्णालयात 50 टक्के महिला कर्मचारी कार्यरत असल्याचे डॉ. धुमाळ यांनी सांगितले. तर पोलीस विभागाने काही अहवाल रुग्णालयाला सादर केला होता. त्यावर समितीने चौकशी केली. तथापि, कोणतीही विभागीय चौकशी करण्यात आलेली नसल्याचे डॉ. युवराज करपे यांनी सांगितले.

सातारा जिल्हा रुग्णालयाने आपल्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांचा दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल तयार करून सादर करावा. तपासात कोणतीही ढिलाई होऊ नये आणि संबंधितांना न्याय मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे. याशिवाय, निराधार माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी पोलीस विभागाने अधिकृत बुलेटिनच्या माध्यमातूनच माहिती प्रसिद्ध करावी. विशाखा समितीच्या कार्यपद्धतीसाठी सुस्पष्ट एसओपी तयार करण्याचे आणि समितीचा तिमाही अहवाल विधि व न्याय विभागाला सादर करण्याचे आदेशही नीलम गोर्‍हे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news