Narendra Dabholkar Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन

Narendra Dabholkar Case
Narendra Dabholkar Casepudhari
Published on
Updated on

Narendra Dabholkar Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाने सचिन अंदुरेला जामीन मंजूर केला.अंदुरेला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट 2013 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन मंजूर झाला होता.

Narendra Dabholkar Case
Narendra Dabholkar Case | एकाला मारले, पण शेकडो दाभोलकर होताहेत तयार…

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पुढारी न्यूजला प्रतिक्रिया देताना नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा हमिद दाभोळकर यांनी, 'अजून विस्तृत निकाल आलेला नाही. तो वाचल्यानंतर पुढं काय करायचं याचा निर्णय घेण्यात येईल. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला देखील एप्रिल महिन्यात जामीन मंजूर झाला आहे. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केली आहे. या प्रकरणातही आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.' असे वक्तव्य केलं.

Narendra Dabholkar Case
Dr. Narendra Dabholkar : सीबीआयच्या अधिकार्‍यांची उलटतपासणी पूर्ण

अनिसच्या पदाधिकारी आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी 'दोन दिवसांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला १३ वर्षे पूर्ण होतील. २०१८ मध्ये अंदुरे आणि कळसकर या दोघांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर २०२४ मध्ये सत्र न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. हे दोघे प्रत्यक्ष खून करणारे आहेत असं कोर्टानं सांगितलं होतं.' असं सांगितलं.

Narendra Dabholkar Case
Narendra Dabholkar Case Verdict | डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

'आधी कळसकर त्यानंतर आता अंदुरेला उच्च न्यायालयाने जामीन दिला. जर या दोघांनी खून केला नाही तर मग कोणी खून केला हे आपल्याला १३ वर्षात शोधता आलं नाही का? या दोघांना सीबीआयने समाजासाठी घातक असं म्हटलं होतं. आताचे बुवाबाजीचे प्रकार पाहता आपण कोणत्या जगात जगतोय हा प्रश्नच पडतोय.' अशी उद्विग्न प्रतिक्रिया देखील मुक्ता दाभोळकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news